मंुबईचे आरोग्य पथक पंढरपुरात मठ्ठा व दहीतून विषबाधा; अन्नसुरक्षा पथक रवाना

By Admin | Updated: May 9, 2014 23:50 IST2014-05-09T21:13:28+5:302014-05-09T23:50:07+5:30

पंढरपूर :

Mumbaai's health team; Pandharpur granary and yogurt poisoning; The Food Security squad is off | मंुबईचे आरोग्य पथक पंढरपुरात मठ्ठा व दहीतून विषबाधा; अन्नसुरक्षा पथक रवाना

मंुबईचे आरोग्य पथक पंढरपुरात मठ्ठा व दहीतून विषबाधा; अन्नसुरक्षा पथक रवाना

पंढरपूर :
आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगा प्रसादातून झालेल्या विषबाधेचे कारण तपासणीसाठी संचालक आरोग्य सेवा पथकाने आंबे गावात व पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेट दिली.
आरोग्य विभागाचे पाच जणांचे पथक पंढरपूर येथे शुक्रवारी दाखल झाले. या पथकामध्ये डॉ. आवटे, डॉ. वाघमारे, डॉ. राजहंस व आणखी दोन डॉक्टरांचा समावेश होता. या पथकाने विषबाधा झाल्यानंतर ताप आला म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्याचबरोबर आचारी व त्याला मदत करणार्‍या लोकांच्या शौचाचे नमुने घेऊन तपासणी केली. या नमुन्याच्या तपासणीसाठी पथकाने प्रयोगशाळा साहित्य त्यांच्याबरोबर आणले होते. या तपासणीवरुन विषबाधा कोणत्या जीवाणूंमुळे झाली असावी याचे नेमके कारण कळणार आहे. त्यांच्याकडून ही विषबाधा मठ्ठा व दहीतून झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता.
त्याचबरोबर अन्न व औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी राजाराम पुजारी यांनी जेवणाचे साहित्य कोणत्या ठिकाणावरुन आणले याची चौकशी केली असता त्यांनी मी आणले नसून मुलाने आणले आहे असे उत्तर दिले. यामुळे त्यांच्या मुलाकडे कोणत्या दुकानातून साहित्य खरेदी केले होते याची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या तीन लोकांचे पथक आंबे (ता. पंढरपूर) येथे रवाना केले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त टी. सी. बोरावके यांनी दिली.
मठ्ठा व दहीचे नमुने मिळाले नाही
उन्हाळ्याचे दिवस असल्याने तयार करण्यात आलेल्या मठ्ठातून विषबाधा होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी वर्तविली. मात्र मठ्ठा व दहीचे नमुने मिळाले नसल्याने यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचे नमुने त्यांनी घेतले. या सर्व नमुन्याच्या तपासणीचा अहवाल लवकर द्या, अशा मागणीचे पत्र राज्य आरोग्य प्रयोगशाळेला दिले असल्याची माहिती सोलापूर विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त टी. सी. बोरावके यांनी दिली.
बारा रुग्णांची वाढ
आंबे (ता. पंढरपूर) येथील आणखी बारा विषबाधेचे रुग्ण शुक्रवारी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पूर्वी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४२ रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उपजिल्हा अधीक्षक पंकज गायकवाड यांनी दिली.
रुग्णांना नेत्यांची भेट
आंबे (ता. पंढरपूर) येथील विषबाधा झालेल्या रुग्णांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, प्रणव परिचारक, भाऊसाहेब जगताप, सुधाकर बंदप˜े तर रिपाइंचे नेते आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार यांनी भेट दिली.

Web Title: Mumbaai's health team; Pandharpur granary and yogurt poisoning; The Food Security squad is off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.