सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडी
By Admin | Updated: February 27, 2017 18:14 IST2017-02-27T18:14:59+5:302017-02-27T18:14:59+5:30
सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडी

सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडी
सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडी
सोलापूर : नई जिंदगी परिसरात मनपा निवडणुकीत दगडफेक व मारामारी करुन फरार झालेले एमआयएमचे तौफिक शेख याला बाळे येथून विजापूर नाका पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्याय दंडाधिकारी ए़ आऱ शेंडगे यांनी २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़
दरम्यान, तौफिक शेख (वय ५०,रा. रेल्वे लाईन ) हा प्रभाग २१, नई जिंदगी परिसरातून एमआयएम पक्षाकडून सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार होता. त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारुण सय्यद हे निवडणूक लढवित होते. त्यात तौफीक शेख हे विजयी झाले़ तत्पुर्वी मनपा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या प्रचार फेरीदरम्यान एकमेकांवर दगडफेक व हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हारुण सय्यद याला अटक केली. तेव्हापासून तौफिक शेख हा फरार होता. रविवारी अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या युक्तीवादावर सुनावणी झाली़ सायंकाळी उशिरा जिल्हा व सत्र न्यायाधीश १११ यांनी ११ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे़ एमआयएम पक्षाचे नुतन नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर यापुर्वीही शहर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ आरोपीतर्फे अॅड़ ईस्माईल शेख, अॅड़ बडेखान तर सरकार पक्षातर्फै अॅड़ आरिफ कोकणी यांनी काम पाहिले़