वाळूजमध्ये महावितरण आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST2021-03-23T04:24:00+5:302021-03-23T04:24:00+5:30

वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथे महावितरण आपल्या दारी या योजनेतर्गत वीज बिल दुरुस्ती व घरगुती व शेतीपंपासाठी वीज ...

MSEDCL at your doorstep in the sand | वाळूजमध्ये महावितरण आपल्या दारी

वाळूजमध्ये महावितरण आपल्या दारी

वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथे महावितरण आपल्या दारी या योजनेतर्गत वीज बिल दुरुस्ती व घरगुती व शेतीपंपासाठी वीज जोडणी शिबिर पार पडले. यावेळी वीज बिल दुरुस्ती तसेच घरगुती ' शेतीपंपासाठी वीजजोडणी अर्ज स्वीकारण्यात आले.

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी घरगुती व्यापारी व औद्योगिक वीजबिले भरून घेणे ही कामे करण्यात आली. तसेच वाळूज येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाले आहे. मानेगाव येथून १७ लाख रुपये खर्च करून पोल टाकण्यात आले आहेत. याचा फायदा वाळूजसह भैरेवाडी, मनगोळी या गावांना होणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता हेमत ताकपेरे यांनी दिली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता ओमसिध्द हुवाळे, उप अभियंता हेमंत ताकपेरे, शाखा अभियंता सत्यजित आंबरे, प्रा. प्रकाश कादे, सुशांत कादे, रवी कांबळे-भोसले, सोमा सुतार, हरी कादे उपस्थित होते.

---

२२ वाळूज

वाळूज येथे महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत वीज बिल दुरुस्तीसाठी आणि भरणा करण्यासाठी सर्वसामान्यांनी गर्दी केली होती.

Web Title: MSEDCL at your doorstep in the sand