आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू झाला आहे़ ऊसाला योग्य दर द्या या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्यावतीने आंदोलने, मोर्चा करण्यात येत आहे़ शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ पूर्वनियोजित आंदोलन असल्याने पोलीसांनी सहकारमंत्र्यांच्या घरासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनहित संघटनेच्यावतीने शुक्रवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल्या रक्ताचा सडा सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच पडला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते. अखेर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये वादावादी झाल्याची माहिती समोर आली़
सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:49 IST
साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनहित संघटनेच्यावतीने शुक्रवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल्या रक्ताचा सडा सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच पडला.
सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे आंदोलन
ठळक मुद्देआंदोलक व पोलीस यांच्यात झाली वादावादीसहकारमंत्र्यांच्या घरासमोर पडला रक्ताचा सडाऊस दर आंदोलन चिघळले, शेतकरी आक्रमक