सोलापूर शहर कॉँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन
By Admin | Updated: December 23, 2016 17:56 IST2016-12-23T17:56:42+5:302016-12-23T17:56:42+5:30
मायक्रो फायनान्सचे कर्जे माफ करावी किंवा सवलत मिळावी या मागणी साठी सोलापूर कांग्रेस पक्षाच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन जिल्हाधिकारी

सोलापूर शहर कॉँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - मायक्रो फायनान्सचे कर्जे माफ करावी किंवा सवलत मिळावी या मागणी साठी सोलापूर कांग्रेस पक्षाच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक महिलांनी पोटतिडकिने आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन ही देण्यात आले.
नोटाबंदी आणि कॅशलेश व्यवहारामुळे कामगारांचे पगार होईना यामुळे गोरगरीबांची उपासमार होत आहे उपासमार होत आहे. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. तशातच काही फायनान्स कंपन्या वसुलीसाठी दमदाटी व काही ठिकाणी मारहाण ही करण्यात आली, तसेच अनेक प्रकारे त्रास देत आहेत. यामुळे विङी कामगार, मायक्रो फायनांसकडून कर्ज घेतलेल्या बचत गटाच्या महिला भयभीत झाले असून कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न महिलांना पडला आहे. यामुळे मायक्रो फायनांन्सचे कर्जे माफ़ करावी किंवा सवलत मिळावी अशी मागणी, यावेळी प्रणिती शिंदे म्हणाले
या आंदोलनात माजी आमदार दिलीपराव माने, नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, नगरसेविका परवीन इनामदार, श्रीदेवी फूलारे, जगदेवी नवले, रफीक हत्तुरे, महिला जिल्हा अध्यक्ष इंदु्मतीअलगोंडा, शहर अध्यक्षा हेमा चिंचोलकर, कस्तूरीबाई मेरगु, निर्मला गालपल्ली, रोशनबी पठाण, तिरुपती परकीपंडला, लक्ष्मी मार्गम, सुमन दिल्लीवाले, नसीमा शिकलगर, लतीफा बागवान, अनीसा बागवान, उमा शिवशिंगवाले, लक्ष्मी गोरलेवाले,अंजना जाधव, गौराबाई दिल्लीवाले, शमा सैयद, जुलेखा विजापुरे, नसरीन शिकलगर, सुमन जाधव, गोसकीताई, अमोल शिंदे, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, माणिकसिंग मैनावाले, रवि बुरहानपुरे, सुभाष वाघमारे, विनाताई देवकते, कमरुन्निसा बागवान, शिल्पा चांदणे , संगीता गायकवाड़, लक्ष्मी भोसले, सुरेखा पवार,संतोष अट्टेलुर, जयंत रच्छा, हर्षवर्धन कमटम, सुनील सारंगी, मनोहर माचर्ला, लालचंद वाधवानी, यांच्यासह हजारो महिला भगिनी या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.