‘विठ्ठल’वरील शोकसभेत सर्वांच्याच भावना झाल्या अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:40 IST2020-12-05T04:40:56+5:302020-12-05T04:40:56+5:30

पंढरपूर : वेणूनगर-गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष आ. भारत भालके यांना शोकसभेद्वारे श्रद्धांजली ...

At the mourning meeting on 'Vitthal', everyone's emotions were aroused | ‘विठ्ठल’वरील शोकसभेत सर्वांच्याच भावना झाल्या अनावर

‘विठ्ठल’वरील शोकसभेत सर्वांच्याच भावना झाल्या अनावर

पंढरपूर : वेणूनगर-गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष आ. भारत भालके यांना शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वांच्याच भावना अनावर झाल्या.

कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सर्वांनी कारखाना व्यवस्थित चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. यावेळी संचालक मोहन कोळेकर, युवराज पाटील, विजयसिंह देशमुख, गोकुळ जाधव, सूर्यकांत बागल, दशरथ खळगे, समाधान काळे, संतोष गायकवाड, नेताजी सावंत, उत्तम नाईकनवरे, धनाजी घाडगे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, दिलीप धोत्रे, गणेश पाटील, मेजर विलास भोसले, दिनकर चव्हाण, रायाप्पा हळणवर, प्राचार्य डी. आर. पवार, दिनकर कदम, किरण घाडगे, तुकाराम मस्के महाराज, सी. एस. पाटील, आर. डी. पवार, शशिकांत शिरगिरे, सतीश देशमुख, कार्यकारी संचालक आर. एस. बोरावके, बी. सी. कर्पे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: At the mourning meeting on 'Vitthal', everyone's emotions were aroused