शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ३९ मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:05 IST

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी

सोलापूर - मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करून त्याच्याकडील ३९ मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली तपास पथक जिल्हयातील मोटारसायकल चोरी करणारे आरोपींच्या मागावर होते. 

  ३० जून २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना पंढरपूर येथील एक इसमाकडे चोरीची मोटारसायकल असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. दरम्यान पंढरपूर शहरात मालविषयी गुन्हयाचे उकल करण्याकामी पेट्रोलिंग करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अमित सिदपाटील यांच्या नेतृृत्वातील तपास पथकास सदरची मिळालेली बातमी सांगून त्यानुसार कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यावरून पोसई/अमित सिदपाटील यांनी त्यांचे सोबत असलेले तपास पथकातील अंमलदार यांचेसह सदर मिळालेल्या बातमीनुसार एका इसमास ताब्यात घेवुन तपास करून याचे कडुन 39 दुचाकी मोटारसायकली एकुण किंमत २१ लाख ४५ हजार  रूपये किंमतीचे जप्त केले आहेत. सदर आरोपीने जिल्हयात व परजिल्हयात केलेले पुढील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.  

एकुण जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकली -39

1.    सोलापूर ग्रामीण -10

2.    सोलापूर शहर   - 04

3.    पुणे जिल्हा        -11

4.    सातारा            - 05

5.    अहमदनगर     - 01

6.    सांगली            - 01

7.    कोल्हापूर        - 01

8.    बीड               - 01

9.    इतर               -05

सदर आरोपीस सध्या वळसंग पोलीस ठाणेकडील गुन्हयात वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षकअमित सिदपाटील, पोहवा राजेश गायकवाड, दिलीप राऊत, श्रीकांत गायकवाड, विजयकुमार भरले, सलीम बागवान, पोना हरिदास पांढरे, रवि माने, पोकाॅ सचिन गायकवाड, चालक पोना केशव पवार यांनी बजावली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी