शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आई, पत्नी अन् मुलाचाही घेतला जीव; नराधम आरोपीला आता घडली आयुष्यभराची अद्दल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:44 IST

बार्शी न्यायालयाने आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Solapur Crime : बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील पत्नी आणि सावत्र आईच्या भांडणास कंटाळून झोपेत असलेली सावत्र आई व मुलास अनिरुद्ध बरडे हातोड्याने मारून जागीच ठार केले, तर पत्नीच्या पोटात कुकरी फिरवून जखमी करून अंगावर रॉकेल ओतून मारून टाकल्याने तिहेरी खूनप्रकरणी बार्शी न्यायालयाने आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे (रा. कोरफळे) याने घरी सतत होत असलेल्या बायको आणि सावत्र आईच्या भांडणाला कंटाळून दि. ९-२- २०१७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या सावत्र आई सखुबाई व मुलगा सुदर्शन यांना हातोड्याने मारून जागीच ठार केले, तर त्याची पत्नी रेश्मा हिचे पोटात कुकरी मारून ती कुकरी फिरवून बाहेर ओढून काढून गंभीर जखमी करून, तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडीपेटीतील काडीने पेटवून दिले. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर ती उपचाराच्या दरम्यान मयत झाली, तसेच मुलगा अविनाश व मुलगी प्रतीक्षा यांनाही कुकरीने मारून जखमी केले. त्यानंतर, स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

वडिलांनीच दाखल केली फिर्याद  

या घटनेबाबत आरोपीचे वडील व्यंकट पंढरीनाथ बरडे यांनी मुलगा आरोपी अनिरुद्ध याच्याविरुद्ध वैराग पोलिसात तक्रार देताच, भादंवि कलम ३०२, ३०७, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला. याचा तपास तत्कालीन पोलिस अधिकारी मधुकर पवार, राजकुमार केंद्रे, रवींद खांडेकर यांनी केला होता. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून, बार्शी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. 

१६ साक्षीदार तपासले

सरकारच्या वतीने १६ साक्षीदार तपासण्यात आले. यातील आरोपीची बायको हिने दिलेला मृत्युपूर्व जबाब, नेत्र साक्षीदार आरोपीची मुलगी, दुसरा मुलगा व डॉक्टर यांची साक्ष, तसेच तपासी अंमलदार यांनी तपासाच्या दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडले.

अशी सुनावली शिक्षा 

सरकारी पक्षाच्या पुराव्याचा विचार करता, न्या.एल.एस चव्हाण यांनी यांनी आरोपी अनिरुद्ध बरडे (रा. कोरफळे) यास ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप आणि १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास, भादं. संहिता कलम ३०७ अन्वये दोषी ठरवून १० वर्ष शिक्षा, ५० हजार रुपयांचा दंड, तो न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर