मुलीला घेऊन मातेने केली हत्ती तलावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:32+5:302021-06-21T04:16:32+5:30

अक्कलकोट : मानसिक आजाराला कंटाळून एका ३० वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन अक्कलकोट शहरातील हत्ती तलावात उडी ...

Mother commits suicide in elephant pond with daughter | मुलीला घेऊन मातेने केली हत्ती तलावात आत्महत्या

मुलीला घेऊन मातेने केली हत्ती तलावात आत्महत्या

अक्कलकोट : मानसिक आजाराला कंटाळून एका ३० वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन अक्कलकोट शहरातील हत्ती तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

सुनीता संतोष गायकवाड (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या मातेचे नाव असून रविवारी सकाळी ७.४५ वाजेच्या पूर्वी ही घटना उघडकीस आली. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात नाेंद झाली आहे.

याबाबत सविता गौतम मडीखांबे (वय ३२, रा. उत्कर्षनगर, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांकडील मिळालेल्या माहितीनुसार सुनीता ही मानसिक आजाराने त्रस्त होती. शनिवारी रात्री घरी सर्व जण झोपी गेल्यानंतर मुलगी आराध्या (वय ५) हिला सोबत घेत तिने हत्ती तलाव गाठले. येथे पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस हवालदार फुलारी करीत आहे.

---

मच्छीमारांना आढळला मृतदेह

रविवारी सकाळी काही मच्छीमार हे मासेमारीसाठी तलावाकडे आले होते. या मच्छीमारांना दोघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती.

Web Title: Mother commits suicide in elephant pond with daughter