शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; जाऊद्याना घरी औषधाची वेळ झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:06 IST

पंढरपुरातील घटना; पहाटेची शुध्द हवा खायला गेलेल्या ३० लोकांना मिळाली पोलीस ठाण्याची हवा...

ठळक मुद्देपंढरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाईपंढरपुरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरूलोकांनी घराबाहेर पडू नये, पोलिसांनी केलेले आवाहन

पंढरपूर : नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र पंढरपुरातील अनेक प्रतिष्ठित लोक याकडे दुर्लक्ष करत मॉर्निंग वॉकसाठी निघत आहेत. सोमवारी पहाटेची शुद्ध हवा खायला गेलेल्या ३० लोकांना पोलीस ठाण्याची हवा खावी लागली आहे. यामुळे पकडलेले प्रतिष्ठित नागरिक आम्हाला जाऊद्याना घरी औषधाची वेळ झाली म्हणून पोलिसांना तासभर विनंती करत होतो.

देशाच्या पंतप्रधानांपासून ते शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर फिरू नये असे आव्हान करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील कोरोना ग्रस्त चा आकडा २०० पार झाला आहे. तरीही पंढरपूरकर मात्र याबाबत गांभीर्याने विचार करत नाहीत. कोरोना पासून बचाव होण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांकडे पंढरपूरकर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मुक्तपणे दुचाकी-चारचाकी तून फिरणे. मुक्तपणे दुचाकी-चारचाकी तून फिरणे. तसेच पहाटे मॉर्निंग वॉक साठी जात आहे. यामुळे उपविभागीय डॉ सागर कवडे यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक गणेश निंबाळकर, पो स फौ. अभिमन्यू डोंगरे, पो कॉ. संदीप पाटील, सचिन भोसले यांनी आज पहाटे इसबावी, लिंक रोड, ठाकरे चौक आदी भागातून वॉकसाठी गेलेल्या लोकांना ताब्यात घेतले. 

त्यांना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले. त्याठिकाणी बराच वेळ बसवल्यानंतर संबंधित लोकांनी आम्हाला औषध घ्यायचा घरी जाऊ द्या. पुन्हा बाहेर फिरणार नाही अशी विनंती केली. या सर्व लोकांवर शासकीय आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. 

कोट :::::::जगभरात करोना रोगाच्या आपत्तीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लॉक डाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरीही काही नागरिक मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने संचारबंदी चे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ३० जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.. सर्व प्रशासन यंत्रणा करोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये;कारण करोना हा संसर्गजन्य रोग आहे. सर्व नागरिकांनी लॉक डाऊन व  संचारबंदी चे पालन केले पाहिजे.- डॉ. सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर

या लोकांवर कारवाई

सतीश बाळू मगर, विशाल कालिदास भोसले, कोंडीबा रामचंद्र वागडे, विनायक रामचंद्र कवठाळकर, संपत निवृत्ती सोनवणे, चंद्रकांत धनाजी देशमुख, सुभाष पांडुरंग यलमार, सुनिल उत्तमराव पाटील, कैलास जगन्नाथ घोडके, विजय गुलाब लोखंडे, भिमराव दशरथ देशमुख, श्रीकांत लक्ष्मण राजगुरू, ओंकार बाळासाहेब भिसे, दिगंबर पांडुरंग चोरमोले, दादा सुखदेव खरात, अल्लीसाहेब गाफुर इनामदार, दिगंबर दादा पवार, दत्तात्रय शिवा पाटील, रमेश हरिबा दिवटे, जयसिंग हरी सातपुते, मल्लाप्पा भीमराव मासाळ, देविदास जगन्नाथ लोखंडे, अतिश दिलीप बनसोडे, हरी बाबू रोकडे, पंडित नारायण डोके, भारत शिवदास भींगे, संतोष दिगंबर गोरे सुभाष गोविंद माने शरीफ मेहबूब खान या सर्वांनी शासकीय आदेशाचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस