शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

१९ वर्षांनी आलेला अधिक आश्विन महिना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 5:49 PM

दर तीन वर्षात एकदा कोणतातरी महिना अधिकमास येतो.

दर तीन वर्षात एकदा कोणतातरी महिना अधिकमास येतो, हे आपणास माहीत आहे. त्यामध्ये सुध्दा सामान्यत: २७ ते ३५ महिन्यात अधिकमास येतो आणि दर १९ वषार्नी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो असा एक साधारण नियम ही अनेकांना माहीत आहे. यापूर्वी सन २००१ यावर्षी अधिक आश्विन महिना आलेला होता त्यानंतर शक १९६१ मध्ये १९ सप्टेंबर २०३९ ते १७ आॅक्टोबर २०३९ या कालावधीत अधिक आश्विन मास आहे. मात्र या नंतरचा अधिक महिना हा श्रावण  असणार असून  शक १९४५ मध्ये १८ जुलै २०२३ ते १६ आॅगस्ट २०२३ दरम्यान हा अधिक श्रावण येईल. 

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ याप्रमाणे १२ चांद्र महिने आहेत. एका अमावास्येपासून दुस?्या अमावास्येपर्यंत एक चांद्रमहिना असतो. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्रमासाचा आरंभ होतो त्यास चैत्रमास म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्रमासाचा आरंभ होतो त्यास वैशाख मास म्हणतात. याप्रमाणे अनुक्रमाने पुढील चांद्रमास होत जातात. प्रत्येक चांद्र महिन्यात सूयार्चे राशिसंक्रमण झाले तर तो नेहमीचा चांद्रमास असतो. परंतु ज्या चांद्रमासात सूयार्चे राशिसंक्रमण होत नाही त्या महिन्यास अधिकमास म्हणतात. यामध्ये सुध्दा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन व फाल्गुन हे अधिकमास होऊ शकतात. सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते, तर चांद्रवर्ष हे ३५४ दिवासांचे असते, म्हणजे चांद्रवर्ष हे ११ दिवसांनी कमी असते.

सुमारे तीन वषार्तून एकदा अधिकमास आला की सौरवर्ष व चांद्रवर्ष यांची सांगड घातली जाते आणि ऋतुचक्राशी सुद्धा जमवून घेतले जाते. सूर्य व चंद्र यावरच मुख्यत: सृष्टीची स्थिति अवलंबून आहे. प्रत्येक चांद्रमासात सूयार्चे राशिसंक्रमण झाले तरच त्या महिन्यास शुचित्व प्राप्त होते. म्हणून सर्ू्य संक्रमण न झाल्यामुळे होणा?्या मासास अधिकमास, मलमास, धोंडामास असेही म्हणतात. मल म्हणजे अशुद्ध अशा अधिकमासात नेहमीची व्रतवैकल्ये करता येत नाहीत. प्रत्येक महिन्याची एक - एक देवता सांगितली आहे. त्याप्रमाणे या अधिकमासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने या अधिकमासास ह्लपुरुषोत्तम मासह्व असेही म्हटले आहे.

या अधिकमासात श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित म्हणजे भोजन करते वेळी न मागता मिळेल तेवढेच खाणे. एक भुक्त म्हणजे माध्याह्नी एक वेळ भोजन करणे, नक्त भोजन म्हणजे दिवसा उपोषण करून रात्री भोजन करणे, मौन भोजन म्हणजे भोजनाच्यावेळी मौनव्रत धारण करणे. याप्रमाणे व्रते करावीत. अशक्ताने (ज्यांना महिनाभर शक्य नाही त्याने) वरीलपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अगर एक दिवस तरी आचरणात आणावा. त्याच प्रमाणे महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ति, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ति, निदान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पाप निवृत्ति होते. या महिन्याची देवता पुरूषोत्तम असल्याने श्रीविष्णुयाग, श्रीसत्यनारायण पूजा करता येईल. या महिन्यात शुक्ल व कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी व अमावास्या या तिथीस आणि व्यतीपात व वैधृति असेल त्या दिवशी अपूपदान (अनरसे दान) करावे. या दिवशी शक्य नसेल तर या महिन्यात कोणत्याहि दिवशी तेहतीस अपूपदान करावे. या अपूपदानाचा संकल्प पंचांगात पान २९ वर दिलेला आहे. ज्यांना अपूपदान देणे शक्य नसेल त्यांनी तेहतीस बत्ताशांचे दान द्यावे. अशाप्रकारे व्रत व दान करून आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व पुण्य मिळवावे हा यामागील हेतु आहे.

या अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत. काम्य कर्मांचा आरंभ व समाप्ति करू नये. जे केल्यावाचून गति नाही अशी कर्मे करावीत. देवतांच्या मूतीर्ची पुन:प्राणप्रतिष्ठा करता येते. ग्रहण श्राद्ध, जातकर्म, नामकर्म हे संस्कार करावेत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध करावीत. गृहारंभ, वास्तुशांति, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण, विवाह, उपनयन, चौल, नवीन देव प्रतिष्ठा करू नये. मात्र साखरपुडा, बारसे, डोहाळजेवण, जावळ, लौकिक गृहप्रवेश, नवीन वाहन-वास्तु खरेदी, नवीन व्यवसाय सुरु करणे, इ. गोष्टी करता येतात.

मकर संक्रातीप्रमाणे अधिक मासाचे वेळी सुद्धा हा अधिकमास चांगला नाही. त्यामुळे या अधिकमासात वाण, दान, अन्नदान इ. करु नये. तसेच हा अधिकमास जावयाला किंवा सुनेला वाईट आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जातात. त्यावर विश्वास ठेवू नये.----------------अधिक मास व श्राद्धमागील वर्षी आश्विन महिन्यात ज्यांचा मृत्यु झाला असेल त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध अधिक आश्विन मासात त्या तिथीस करावे. यापूर्वीच्या अधिक आश्विन मासात ज्यांचा मृत्यु झालेला असेल त्यांचे दरवषार्चे श्राद्ध अधिक आश्विनातच करावे. मात्र दरवषीर्चे आश्विन मासात ज्यांचे श्राद्ध असेल त्यांचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध यावर्षी निज आश्विन मासात त्या तिथीस करावे.यानंतर सन २०२३ मध्ये अधिक श्रावणमास आहे.- मोहन दाते (पंचांगकर्ते) 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक