शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मम्मी-पप्पा तुम्ही काळजी घ्या, मी गावाकडे आनंदित...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:57 IST

आई अन् वडील अत्यावश्यक सेवेत व्यस्त; अडीच वर्षांच्या चिमुकलीचा आजी-आजोबा करतात सांभाळ

ठळक मुद्दे- कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू- संसर्ग टाळण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू- नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे केले आवाहन

नासीर कबीरकरमाळा : कोरोना प्रादुर्भावामुळे अनपेक्षित असे संकट तयार होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फटका वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या प्रकाराने बसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीट (ता़ करमाळा) येथील ढेरे परिवारातील गौरवी या अवघ्या दोन वर्षे चार महिने वयाच्या चिमुकलीला कोरोनामुळे आई-वडिलांपासून दूर राहत आहे.

गौरवीचे वडील गौतम हरिश्चंद्र ढेरे हे पुणे जिल्ह्यातील मुंढवा, केशवनगर, सदाशिव पेठ येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. आई वर्षा ढेरे या निर्मलनगर पोलीस ठाणे, वांद्रे, मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा देत आहेत. सध्या ते दोघेही कोरोना विरोधातील लढ्यात सक्रिय असल्याने त्यांना गौरवीसाठी वेळ देता येत नाही. परिणामी गौरवीला वीट (ता. करमाळा) येथे आजी- आजोबांकडे ठेवण्यात आले आहे.

गेल्या महिनाभरापासून गौरवी ही आजोबा हरिश्चंद्र ढेरे व आजी सुमन ढेरे यांच्यासोबत वीट येथे राहत आहे. दरम्यान, मम्मी-पप्पांची गेल्या महिन्यापासून भेट झाली नसल्याने गौरवीला त्यांची ओढ लागली आहे़ मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या काळजीसाठी सेवा देणाºया तिच्या आई, वडिलांना तिची भेट घेता येईना़ अशा स्थितीत आजी अन् आजोबा लहानग्या गौरवीला आनंदी ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरताना दिसत आहेत.कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांना फटका बसला आहे. अनपेक्षितपणे विविध अडचणींशी तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत शासकीय सेवेत असणारे आई, वडील दोघेही कोरोना लढाईत सक्रिय असताना त्यांना चिमुकलीपासून दूर राहताना भावनिक संघर्षालाही तोंड द्यावे लागत असल्याचे गौरवीवरुन दिसून येत आहे. त्या चिमुकलीची अवस्था पाहून नागरिकांनी आतातरी घराबाहेर जाणे टाळले पाहिजे, असे सांगितले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस