'बीआरएस'च्या अल्पसंख्यांक समिती शहराध्यक्षपदी मोहसीन शेख
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 19, 2023 14:05 IST2023-12-19T14:05:01+5:302023-12-19T14:05:19+5:30
हैदराबाद येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात नियुक्त पत्र प्रदान करण्यात आला.

'बीआरएस'च्या अल्पसंख्यांक समिती शहराध्यक्षपदी मोहसीन शेख
सोलापूर : भारत राष्ट्र समितीच्या सोलापूर अल्पसंख्यांक समिती शहराध्यक्षपदी मोहसीन शेख यांची निवड झाली आहे. तेलंगणाचे माजी अर्थमंत्री बीआरएसचे नेते हरीश राव तसेच सोलापूर बीआरएसचे शहराध्यक्ष दशरथ गोप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन मोहसीन शेख यांचा सत्कार करण्यात आला.
हैदराबाद येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात नियुक्त पत्र प्रदान करण्यात आला. यावेळी बीआरएसचे नेते नागेश वल्ल्याळ,माजी नगरसेवक संतोष भोसले, जयंत होले-पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.