शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मोहोळ, सांगोला मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:25 IST

निवडणूक आयोगाकडून दखल; मतदार जागृतीचे विशेष उपक्रम घेण्याची सूचना

ठळक मुद्देजिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ३१ आॅगस्टला मतदार यादी निश्चित करण्यात आली १७ लाख ९० हजार ८९0 पुरुष तर १६ लाख ३० हजार ३४५ महिला आणि तृतीयपंथी ८९ असे एकूण ३४ लाख २१ हजार ३२४ मतदारएकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिला  मतदार नोंदणीचे प्रमाण काही तालुक्यात कमी असल्याचे आढळून आले

राजकुमार सारोळे 

सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यात मोहोळ व सांगोला मतदारसंघात महिला मतदारसंघाची टक्केवारी कमी आढळल्याने विशेष अभियान राबविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. 

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ३१ आॅगस्टला मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. यात १७ लाख ९० हजार ८९0 पुरुष तर १६ लाख ३० हजार ३४५ महिला आणि तृतीयपंथी ८९ असे एकूण ३४ लाख २१ हजार ३२४ मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिला  मतदार नोंदणीचे प्रमाण काही तालुक्यात कमी असल्याचे आढळून आले आहे. 

यामध्ये मोहोळ: ६८.९५, सांगोला: ६७.८८ असे महिला मतदारांचे प्रमाण आहे. सांगोला तालुक्यात दरहजारी पुरुष ९0६ तर महिला ८८२ आणि मोहोळ तालुक्यात पुरुष ९0७ तर महिलांचे ८८२ असे प्रमाण आहे. याउलट करमाळा मतदारसंघात हे प्रमाण समसमान आहे तर बार्शी, पंढरपूर व शहर मध्यमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इतर विधानसभा मतदारसंघात महिला मतदार नोंदणी कमी का झाली याची कारणे शोधून नवीन मतदार नोंदणी ४ आॅक्टोबर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मतदार जनजागृती अभियानात या तालुक्यांना जादा लक्ष द्यावे अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. या मतदारसंघात महिला मतदार नोंदणीसाठी खास कार्यक्रम घ्यावेत असे कळविले असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले. 

मतदार जनजागृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हा परिषदेत मतदार जनजागृतीची शपथ घेण्यात आली. शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. वालचंद कॉलेज, एसईएस ज्युनिअर कॉलेज, भारती विद्यापीठ, पंढरपूर येथे झालेल्या सुधारित आराखड्याच्या मूल्यमापन प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या शिक्षकांना शपथ देण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव, वागदरी, नागणसूर,  मैंदर्गी, पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी, पांढरेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप,  अकलूज येथील जिल्हा परिषद शाळांनी प्रभातफेरी काढली. उपमुख्य कार्यकारी  अधिकारी चंचल पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतींना दोन आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामसभेत मतदार जनजागृतीचा विषय अजेंड्यावर घेऊन उपस्थित  ग्रामस्थांना शपथ देण्याविषयी सूचित केले आहे. 

असे आहे दरहजारी  महिला मतदारांचे प्रमाण

तालुका    पुरुष (टक्के)        महिला

  • करमाळा        ७२.७९    ७२.३७
  • माढा             ७३.२५    ६९.५९
  • बार्शी             ७0.४६    ७२.२८
  • मोहोळ           ७0.९४    ६८.९५
  • शहर उत्तर       ७३.६४    ७२.४0
  • शहर मध्य       ७५.२0    ७६.0१
  • अक्कलकोट      ७६.११    ७४.१0
  • दक्षिण सोलापूर     ७७.२८     ७३.४८
  • पंढरपूर              ६९.३७    ७७.५0
  • सांगोला              ६९.६९    ६७.८८
  • माळशिरस           ७१.८६    ६९.४२
  • एकूण                 ७२.७0     ७२.१४
टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmohol-acमोहोलsangole-acसांगोल