मोहोळ भाजपाने केली देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:40+5:302021-03-22T04:20:40+5:30

मोहोळ: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते ...

Mohol BJP demands Deshmukh's resignation | मोहोळ भाजपाने केली देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

मोहोळ भाजपाने केली देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

मोहोळ: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.

माेहोळ भाजपच्या वतीने तहसील कार्यालयात या मागणीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, भाजयुमोचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय क्षीरसागर, तालुका सरचिटणीस सतीश पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष शंकर वाघमारे, महेश सोहणी, मुजीप मुजावर, संतोष नामदे, अवदुंबर वाघमोडे, दिगंबर वसेकर , स्वप्नील डोंगरे, भाऊ सोनटक्के, लतिका बनसोडे उपस्थित होते.

----

२१ मोहोळ बीजेपी

मोहोळ भाजपाच्या वतीने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात देताना सुनील चव्हाण, संजय क्षीरसागर,सतीश पाटील.

Web Title: Mohol BJP demands Deshmukh's resignation