शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
4
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
5
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
6
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
7
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
8
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
9
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
11
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
12
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
13
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
14
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
15
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
16
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
17
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
18
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
19
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
20
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले

मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा अन् शिंदे बंधूंचे अस्तित्व पणाला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:34 IST

ग्रामीण भागात टिकटिक; शहरी भागात कमळ उमलण्याची चर्चा, वाढलेल्या मतदानावरच उमेदवारांच्या विजयाची भिस्त

ठळक मुद्देमागील वीस पंचवीस वर्षांपासून आमदार बबनराव शिंदे व झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांचे सर्व विरोधक प्रथमच एकत्र आलेसंजय शिंदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून उमेदवारी स्वीकारताच शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले मोहिते-पाटील अधिकच अस्वस्थ झाले होते.

डी. एस. गायकवाड

टेंभुर्णी : माढा तालुक्यात लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात झालेली चुरशीची लढत वरकरणी पक्षीय वाटत असली तरी माढा तालुक्यात पुन्हा एकदा पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागात घड्याळाची टिकटिक वाढली असून, शहरी भागात कमळ उमलल्याची चर्चा आहे. माढा विधानसभा मतदारसंघात झालेले ६९.५२ टक्केमतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकंदरित ही निवडणूक मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर शिंदे बंधूंसाठी अस्तित्वाचीच ठरणार आहे.

संजय शिंदे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतल्याने भाजपच्या विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागले. यामुळे त्यांनी संजय शिंदे यांना खिंडीत पकडण्याची रणनीती आखली होती. त्यानुसार माढा तालुक्यातील संजय शिंदे यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करण्याची जबाबदारी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर सोपवण्यात आली होती.

राऊतांनीही ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या चाणक्य नीतीचा वापर करून माढा तालुक्यातील जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, वेंकटेश पाटील, संजय पाटील-भीमानगरकर, सुधीर महाडिक आदींची मोट बांधून मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांची भेट घालून संजय शिंदे यांना होमपिचवर घेरण्याची रणनीती आखली होती.

संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून उमेदवारी स्वीकारताच शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले मोहिते-पाटील अधिकच अस्वस्थ झाले होते. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मोहिते-पाटील परिवाराने शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला माढा तालुका निवडणूक काळात पिंजून काढला. जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन सक्रिय केले होते व दबा धरून बसलेल्या संजय शिंदे विरोधकांना एकत्र केले होते.

अनेकांना वेगवेगळे शब्द देऊन भाजपच्या डेºयात दाखल केले. यानंतर भाजपमध्ये जाणाºयांची रांगच लागली होती. यामध्ये भारत पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, मोडनिंबचे बाबुराव सुर्वे, सापटण्याचे सागर ढवळे यांचा समावेश होता.बघता बघता संजय शिंदे यांच्या विरोधात माढा तालुक्यातील भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, संजय पाटील-भीमानगरकर, भारत पाटील, टेंभुर्णीतील कृष्णात बोबडे आदी सर्व मंडळी शिंदे विरोधात कामाला लागली होती.

माढा तालुक्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गटातटाचे राजकारण प्रभावी ठरल्याचे चित्र या निवडणुकीत पाहावयास मिळाले. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे हे पक्षीय राजकारणासाठी आग्रही दिसत होते तर बाकीचे शिलेदार मात्र तालुक्याबाहेरच्या गॉडफादरच्या मार्गदर्शनाखाली शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या भूमिकेतून गटातटाचे राजकारण करून आपला राजकीय हिशोब चुकता करण्यात गुंतले होते. भाजपमध्ये होणारी ही सर्व पळवापळवी व पळापळ होत असताना नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जनतेला मात्र गृहीत धरले होते. 

मागील वीस पंचवीस वर्षांपासून आमदार बबनराव शिंदे व झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांचे सर्व विरोधक प्रथमच एकत्र आले होते. यामध्ये मोहिते-पाटलांपासून ते शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, शिवाजी कांबळे, संजय पाटील-भीमानगरकर, भारत पाटील, राजाभाऊ चवरे, जयंत पाटील, कृष्णात बोबडे, वेंकटेश पाटील ,बाबुराव सुर्वे, सुधीर महाडिक आदींचा समावेश होता.

दुसरीकडे संजय शिंदे यांनी बरोबर असणारी नेतेमंडळी व गावागावात असणारे कट्टर समर्थक व जनता यांच्या विश्वासावर आत्मविश्वासाने खिंड लढवली आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्यासह माजी आमदार विनायकराव पाटील, पंचवीस वर्षे साथ सोडलेले संजय पाटील-घाटणेकर, माजी उपसभापती बंडू ढवळे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, भाई शिवाजीराव पाटील, रमेश पाटील, रावसाहेब देशमुख, कैलास तोडकरी, दादासाहेब तरंगे, निशिगंधा माळी, उद्धव माळीआदी मंडळी खांद्याला खांदा लावून प्रचारात सक्रिय होते. आमदार बबनराव शिंदे यांचा तालुक्यातील गावागावात असणारा दांडगा संपर्क हे संजय शिंदे यांचे बलस्थान आहे. आमदार शिंदे यांनीही निवडणुकात बाहेरील तालुक्यात फारसे लक्ष न देता माढा तालुका पिंजून काढला. करमाळ््यातही उमेदवार संजय शिंदे यांच्याऐवजी यशवंत शिंदे व रश्मी बागल यांनीच प्रचार केला. आता निकालाकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.

सत्ता केंद्राचा ‘आधार’ कोणाला ?- माढा तालुक्यातील टेंभुर्णी, बेंबळे, कुर्डू, मोडनिंब, भोसरे उपळाई मानेगाव हे सातही जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात शिंदे बंधूंचे वर्चस्व आहे. मागील पंचवीस वर्षांपासून माढा तालुक्यातील सर्व सत्ता केंद्रे आमदार शिंदे यांच्या ताब्यात आहेत. या सर्व सत्ता केंद्राच्या माध्यमातून तालुक्यात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे हे संजय शिंदे यांचे या निवणुकीतील बलस्थान आहे. निष्ठावंत कार्यकर्ते, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गटाताटाभोवती फिरत राहिलेला प्रचार, आपला माणूस म्हणून घातलेली साथ, काही जातीय समीकरणे याचा फायदा शिंदे यांना होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

... तर सोलापूरच्या राजकारणावर परिणाम- माढा लोकसभेच्या निकालानंतर कोणीही विजयी झाले तरी त्याचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. संजय शिंदे विजयी झाले तर जिल्ह्यात सत्तेचे केंद्र अर्थातच निमगावकडे सरकणार आहे तर रणजितसिंह नाईक निंबाळकर विजय झाले तर पुन्हा अकलूज केंद्रस्थानी असणार आहे. ही निवडणूक भाजपच्या विशेष करून मोहिते पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासह शिंदे बंधूंच्या अस्तित्वाची ठरणार आहे.

सव्वादोन लाख मतदान- माढा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २४ हजार ६८२ एवढे मतदार असून यामध्ये १ लाख ७२ हजार ९३ पुरुष व १ लाख ५२ हजार ५८९ महिलांचा समावेश आहे. यापैकी २ लाख २५ हजार ७०८मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघात ६९.५२ टक्के मतदान झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर