शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांसाठीचा सोलापुरातील गृहप्रकल्प मोदी यांना भावला; मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 10:34 IST

महेश कुलकर्णी  सोलापूर : ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सहभागातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे उभारण्यात येणारा रे नगर ...

ठळक मुद्देरे नगरचा बुधवारी पायाभरणीकेंद्राचे १२० कोटी सुपूर्द होणारआशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प म्हणून रे नगरकडे पाहिले जाते

महेश कुलकर्णी 

सोलापूर : ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सहभागातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे उभारण्यात येणारा रे नगर गृहप्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावला असून, अशा प्रकारचे प्रकल्प देशभर उभे करण्यासाठी या प्रकल्पाची अधिक माहिती मागवून घेतली आहे. म्हाडाच्या अधिकाºयांमार्फत ही माहिती पंतप्रधानांकडे पोहोचविली जात आहे. बुधवारी पार्क मैदानात या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 

खालच्या घटकातील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने हे धोरण आखलेले असताना सोलापुरात मात्र हा प्रयोग गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी यापूर्वी १५ हजार घरे विडी कामगारांसाठी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेद्वारे १० हजार घरे आणि कॉ. मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ५,१०० घरे बांधण्यात आली आहेत. या दोन प्रकल्पानंतर ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ३० हजार घरांचा प्रकल्प सुरू केला आहे.  (क्रमश:)

मोनोलिथिक तंत्रज्ञानाचा वापर- आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प म्हणून रे नगरकडे पाहिले जाते. कामगारांना स्वस्तात घरे देण्यासाठी आंतरराष्टÑीय पातळीचे मोनोलिथिक तंत्रज्ञान येथे वापरण्यात येत आहे. याद्वारे एकदाच १२ घरांचा सेट बनविण्यात येतो. यामध्ये भिंती आणि स्लॅब एकत्रित उभा होतो. अशी महिन्याला आठशे घरे पूर्ण होतात. 

बांधकामासाठी आंतरराष्टÑीय पातळीवरील तंत्रज्ञान वापरल्यामुळे कामगारांना स्वस्तात आणि मजबूत घरे उपलब्ध होतील. लोकसहभागातून उभारण्यात येणाºया रे नगरच्या घरांची माहिती पंतप्रधानांनी मागविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या अधिकाºयांना मी स्वत: माहिती देतोय. - अंकुर पंधे, विकासक, रे नगर गृहनिर्माण संस्था

टॅग्स :SolapurसोलापूरHomeघरNarendra Modiनरेंद्र मोदीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स