शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीतील साखर कारखान्यांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 20:54 IST

आ. प्रशांतराव परिचारक; युटोपीयन  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २२०० रुपये   दर, कामगारांना बोनस:  दिवाळी गोड  

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे

जागतिक पातळी वरती साखरेला वाढत असणार्‍या मागणीमुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीत असणार्‍या साखर कारखान्यांना चांगला दिलासा मिळेल व पुढील तीन ते चार वर्षात साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर निघेल व शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल असा आशावाद सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. कचरेवाडी (ता.मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या  आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ  पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक आ.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक, यांचेसह पांडुरंग स.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, पंढरपूर कृ.उ.बाजार समितीचे सभापती दिलीपअप्पा घाडगे, झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील, बापूराया चौगुले, भारत पाटील, राजेंद्र पाटील,  दाजी पाटील, दिलीप चव्हाण, सतीश मुळे, लक्ष्मण धनवडे, बाळासाहेब देशमुख, रतीलाल गावडे, राजुबापू गावडे, आगतराव रणदिवे, खंडेराव रणदिवे, अरुण घोलप, इन्नुसभाई शेख, शिवाजीराव नागणे, औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकुल, जालिंदर व्हनुटगी, नितिन पाटील, शरद पुजारी, सिद्धेश्वर कोकरे, नामदेव जानकर, बाळदादा काळुंगे, संभाजी माने,पांडुरंग हाके,धनाजी कोळेकर, सुधाकर पाटील, सचिन चौगुले, नागनाथ कोळी , कल्याण नलवडे अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सी.एन.देशपांडे तसेच मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक ठेकेदार आणि कारखान्याचे  सर्व खातेप्रमुख,अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 यावेळी बोलताना आ.परिचारक म्हणाले की, युटोपियनचा आठवा गळीत हंगाम असून  मागील सात ही हंगामात युटोपियन ने विक्रमी उत्पादन केले आहे. सध्या राज्यातील व परिसरातील कारखानदारी अडचणीत आहे. परिसरातील कारखान्याचे ऊस उत्पादक चिंतेत आहेत. मात्र,सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेऊन राजकारण विरहीत कारखाना चालविणे आज काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांचा ही ऊस गळीतास आणण्याच्या दृष्टीने युटोपियन शुगर्स प्रयत्न करणार आहे.देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे साखर उद्योगासाठी सकारात्मक असून,त्यांच्या प्रयत्नाने इथेनॉल निर्मितीस चालना मिळत आहे. त्यामुळे देशांतर्गत असणार्‍या जास्तीच्या साखरेचे उत्पादन कमी होऊन,उपलब्ध साखरेस चांगला दर मिळेल त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांनी एकूण गाळपाच्या ३०% पर्यन्त इथेनॉलबनवणे गरजेचे आहे असे मत आ.परिचारक यांनी व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, कै परिचारक यांच्या आदर्शावरती  वाटचाल करीत असून,सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे.मात्र शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य तो दाम देण्याची भूमिका  घेतली जाईल. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गळीत झालेल्या ऊसासाठी एकूण दर २२०० रु,प्रमाणे दिला जाईल  कर्मच्यार्‍यांना ही दिवाळी बोनस देणार असल्याची घोषणा उमेश परिचारक यांनी केली.

 पुढे बोलताना आ .परिचारक म्हणाले की, चालू गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊसाची नोंद आहे. मागील सर्व विक्रम मोडीत काढीत नवे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.सध्या सततच्या पाऊसामुळे चालू वर्षी ऊस तोडणी मध्ये विलंब होण्याची शक्यता असून चालू गळीत हंगाम हा लांबण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर असणार्‍या अडचणी मध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ही चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ६.५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल व कारखान्याच्या आसवांनी प्रकल्पातून १ कोटी ५० लाख लिटर इथेनॉल चे उत्पादन करण्यात येणार आहे.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन शुगर्स च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

 शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देऊन परिचारक कुटुंबाने सहकारी संस्था  जिल्ह्यात नावारूपाला आणल्या तसेच  विकासाच्या योजना राबवून तालुक्याचे हित जोपासल्याचे प्रतिपादन झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPandharpurपंढरपूरPrashant Paricharakप्रशांत परिचारक