मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे : सुशिलकुमार शिंदे
By Appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 11:08 IST2017-07-29T11:06:13+5:302017-07-29T11:08:04+5:30
सोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत.

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे : सुशिलकुमार शिंदे
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. अमेरिका, पाकिस्तान येथे जाऊन तेथील पंतप्रधानांची गळाभेट घेण्यापेक्षा भारत-चीन सीमावाद निवळण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. सद्यस्थितीत चीनसोबत युद्ध झाल्यास हा खर्च देशाला परवडणारा नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण चुकत आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी मांडले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरच्या दौºयावर आहेत. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील घडामोडींकडे लक्ष वेधले. देशातील काँग्रेस नेत्यांच्या उद्योगांवर व घरावर सीबीआयच्या धाडी पडत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अशा धाडी पडत असल्याने काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राजीनामा देऊन लगेच एनडीएसोबत गेले. या सर्व घडामोडी ज्या वेगवान पद्धतीने घडल्या आहेत त्या अर्थी नितीशकुमार हे खूप दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. यापूर्वीही नितीशकुमार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे भाजपचा घरोबा त्यांना नवीन नाही. आजपर्यंत ते करत असलेला धर्मनिरपेक्षपणाचा दावा आता फोल ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावरून नेतृत्वाच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. याबद्दल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया नावाने हिणवले जात होते. त्यांनी बांगला देशाची निर्मिती केल्यानंतर त्यांचा उल्लेख आयर्न लेडी असा झाला. राजीव गांधी यांच्याबाबतीतही असेच घडले होते. हवाई जहाज चलानेवाला देश क्या चलऐगा, अशी टीका होत होती. त्यांनी देशात माहिती प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून दाखविली. राहुल गांधी यांना देखील व्हिजन आहे. ते देखील या पद्धतीनेच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. प्रियांका गांधी या तूर्तास राजकारणात येण्याची शक्यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
--------------------
आरटीओचा दंड, भीती वाटली
आरटीओने मला दंड केला हे ऐकून भीती वाटली, असे मिश्कील उत्तर शिंदे यांनी यावेळी दिले. दंड करण्याचा अधिकार आरटीओला नाही. त्यांनी विलंब शुल्क घेतले आहे, असे स्पष्टीकरण करताना शिंदे यांनी वाहन परवाना नूतनीकरणामागचे कारण सांगितले. राज्याचे महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या वडिलांच्या फियाटमधून मी १९६४ मध्ये वाहन परवाना काढला. त्यानंतर वेळोवेळी त्याचे नूतनीकरण केले. गेल्या पाच वर्षात मी केंद्र सरकारमध्ये असल्याने दिल्लीत होतो. त्यामुळे वाहन परवाना नूतनीकरणाची जबाबदारी एका मित्रावर दिली होती, पण तो विसरला. नूतनीकरणाची मुदत संपून पाच वर्षे होत असल्याने परवाना रद्द होईल म्हणून मी गुरुवारी आरटीओ कार्यालयात जाऊन नूतनीकरण केले.