शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक नवदुर्गा ; संकटावर स्वार झालेल्या कोंडाबाईने केले सहा जणांना डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 10:47 IST

महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर असून, पतीच्या निधनानंतर, प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबातील नऊ ...

महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर असून, पतीच्या निधनानंतर, प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबातील नऊ मुलांचा सांभाळ यशस्वीपणे तर केलाच पण सहा नातवंडे आज उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहेत. या सगळ्यांचीच प्रेरणास्थान राहिलेल्या जिद्दी कोंडाबाई (अक्का) नागनाथ बाबर या नवदुर्गेची कहाणी अंगावर शहारे आणणारीच आहे.

२५ डिसेंबर १९९२ रोजी वडवळ (ता. मोहोळ) येथे राहणाºया कोंडाबाई यांचे पती नागनाथ यांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पदरात ६ मुले व ३ मुली... मात्र या संकटांना कोंडाबाई घाबरल्या नाहीत. उलट धाडसी पतीप्रमाणेच आपल्या कमरेला पदर खोचून त्या ताठ मानेने उभ्या राहिल्या. त्यांना मोहन, दिलीप, विष्णुपंत, पोपट, राजाराम व दयानंद ही ६ मुले तर सिंधू, सुनीता व मीनाक्षी या ३ मुली. या सर्वांना आपल्या वडिलांची उणीव न जाणवू देता, ही माऊलीच त्यांचे सर्वस्व झाली.

सर्व मुलांनी देखील आईची शिकवण अंगीकृत करून जिद्दीने प्रारंभ केला. आज मोहन हे भारतीय सैन्यात अधिकारी तर त्यांची मुले डॉ. शक्तीजित, डॉ. शांती, डॉ. सत्यजित हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. दिलीप यांची मुलगी डॉ. मोहिनी पुणे येथे स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर विष्णुपंत यांची मुलगी डॉ. अंजली ही शिकत आहे. मुलगी सुनीता हिची मुलगी डॉ. कांचन सातपुते ही देखील वैद्यकीय शिक्षण घेत आहे 

बाबर कुटुंबातील या जडणघडणीमध्ये जयश्री, विजया, संगीता, कविता, सुप्रिया, कल्पना या सहा सुना व सिंधू, सुनीता, मीनाक्षी या तीन मुली जणू नवरात्रीची नऊ रूपे झाली आहेत. कोंडाबाई यांची आज देखील हीच शिकवण आहे. कष्ट करणाºयाच्या मागे सदैव देव असतो, त्यामुळे कोणत्याही कामाला लाजू नका, शिक्षण घेतले की ते नक्की यशस्वी करतेच.

कष्ट करा... लाजू नका!च्कष्ट हेचं आपलं दैवत मानून कोंडाबाईनं निरक्षर असूनही पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा वसा वाढवला. आयुष्यभर संघर्ष करत जागलेल्या सावित्रीबार्इंचा आदर्श मानत त्यांनी जीवनाशी दोन हात केले. कोणतेही काम करताना त्यांनी कमी न मानता कष्टाला न लाजता केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे हा स्तुतीपाठ आपल्या मुलांपुढे ठेवला. उच्च विद्याविभूषित मुलांनीही माऊलीच्या या कष्टाचे चिज केलं. वडिलांच्या अकाली निधनानंतरही आईने वाढवलं  याचा सर्वांनीच ठेवलीय. मुलं शिकली मोठी झाली. नातवंडानीही नाव काढलं. आयुष्यात केलेल्या या संघर्षाचं काही वाटत नाही. मन तृप्त झाल्याची भावना कोंडाबाई व्यक्त करतात.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीdocterडॉक्टर