शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहिता; रथावरील मोदींचा चेहरा परवान्याअभावी झाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 09:23 IST

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता चार तर माढा मतदारसंघात तीन प्रचार रथांच्या वाहनांसाठी परवानगी मागितली वंचित आघाडीच्या उमेदवाराकडून एका प्रचार वाहनासाठी परवानगी मागण्यात आली

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी तैनात केलेल्या वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात येते. भाजपकडून प्रचारासाठी सात रथ एलईडी  स्क्रीनसह सज्ज करण्यात आले आहेत. या वाहनांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून प्रचाराची परवानगी मिळेपर्यंत रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा कागदाने झाकण्यात आला. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता चार तर माढा मतदारसंघात तीन प्रचार रथांच्या वाहनांसाठी परवानगी मागितली आहे. याशिवाय उमेदवाराकडून एका रथाचा अर्ज असून, त्यास परवानगी देण्यात आली आहे. पक्षीय पातळीवरून आलेल्या तीन वाहनांची कागदपत्रे व आरटीओ कार्यालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या रथाच्या प्रचाराला हिरवा कंदील जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणार आहे. परवानगी मिळेपर्यंत प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने व त्या वाहनांवरील सर्व चिन्हे व नेत्यांची छबी निवडणूक कार्यालयाकडून झाकण्यात येत  आहे.

काँग्रेसकडून सात प्रचार रथांची परवानगी मागण्यात आली आहे. यात उमेदवाराकडून मागणी आलेल्या पाच प्रचार रथांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचार रथाला परवानगी देण्यासाठी संबंधित वाहनांची कागदपत्रे, फिटनेस याबाबत आरटीओ कार्यालयाकडून तर गुन्हेगारी परिस्थितीबाबत पोलिसांकडून अहवाल मागविण्यात येतो.

वंचित आघाडीच्या उमेदवाराकडून एका प्रचार वाहनासाठी परवानगी मागण्यात आली आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे काम सुरू आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वाहनांच्या प्रचारास परवानगी देण्यात येईल. उमेदवारांकडून सुरू करण्यात आलेल्या प्रचार वाहनांचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तर पक्षपातळीवरून आलेल्या वाहनांचा खर्च आयोगाकडे पक्षपातळीवर देण्यात येणार असल्याची माहिती एक खिडकी योजनेतील अधिकाºयांनी दिली. 

कॉर्नर सभेच्या मैदानांसाठी मागणी- सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात माढा लोकसभा मतदारसंघातही प्रचाराचा जोर वाढणार आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉर्नर सभा वा बैठकीसाठी जागेच्या परवानगीसाठी एक खिडकीकडे अर्ज येत आहेत. जाहीर सभा घेण्यासाठी शहरातील मैदान देण्याबाबत अजून तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडून मागणी आली नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक