शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होम अन् ऑनलाइन शिक्षणप्रणालीचा मोबाईल विक्रेत्यांना होतोय फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 10:18 IST

दोन दिवसात सोलापुरात ५० लाखांची उलाढाल; स्मार्टफोन, टॅबला सर्वाधिक पसंती

ठळक मुद्देसोलापूर शहरात मोबाईल खरेदीसाठी गर्दीस्मार्टफोन आणि टॅबला सर्वाधिक पसंतीमोबाईलसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गर्दी

सोलापूर : लॉकडाऊन काळात रूजू झालेल्या वर्क फ्रॉम होम आणि आॅनलाइन शिक्षणप्रणालीमुळे मोबाईल खरेदीसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसात ५० लाखांची मोबाईल क्षेत्रात उलाढाल झाली असून नोकरदार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोबाईल खरेदीला अधिक पसंती दिल्याचे सांगण्यात आले.

कोरोना या विषाणूजन्य आजार वाढत आहे. रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला़ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली. त्यामुळे लॉकडाऊन काळात ९० टक्के नोकरदारांनी मोबाईलवरूनच वर्क फ्रॉम पूर्ण केले. शिवाय बºयाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अपूर्ण राहिल्याने राहिलेला अभ्यासक्रम संबंधित शिक्षकांनी आॅनलाइनव्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पूर्ण करून घेतला़ त्यामुळे लॉकडाऊन काळात मोबाईलचे महत्व वाढले.-----------नोकरदार, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मागणीआता मोबाईल फक्त बोलण्यापुरता राहिलेला नाही़ सर्वच क्षेत्रात मोबाईलचा अधिक वापर वाढला आहे़ अभ्यासक्रम, क्लासेस, वर्क फ्रॉम होम मुळे मोबाईल, टॅबला लॉकडाऊननंतर चांगली मागणी आहे़ १२ ते ६० हजार रूपयांपर्यंतचा टॅब आणि ६ हजार ते दीड लाखांपर्यंत स्मार्टफोनची विक्री होत आहे़  सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून ४०० ते ५०० मोबाईलचे दुकाने आहेत़ मागील दोन दिवसात स्मार्टफोन, टॅब व अ‍ॅक्सेसेरीजमधून अंदाजे ५० लाखांची उलाढाल झाल्याची माहिती ज्योती टेलिकॉमचे प्रमुख महेश चिंचोळी यांनी दिली.----------लॉकडाऊननंतर मोबाईल खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे़ आॅनलाइन शिक्षण प्रणाली व अडीच महिन्यानंतर दुकाने उघडल्याने ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला़ सुरूवातीला ग्राहक खरेदीपेक्षा चौकशी अधिक करीत आहेत. सध्या अ‍ॅक्सेसेरीजला अधिक मागणी आहे़ आॅनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मोबाईल खरेदी वाढली आहे.- महेश चिंचोळी,ज्योती टेलिकॉम, सोलापूर------------मागील मार्केटचा विचार केला तर मोबाईल खरेदी ३० ते ४० टक्के वाढली आहे. लॉकडाऊननंतर दुकाने उघडल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे़ स्मार्टफोन, टॅब खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे़ चार्जर, बॅटरी, कव्हर, हेडफोन अन्य मोबाईलसाठी लागणाºया साहित्यांचीही खरेदी होत आहे.- विजय गोस्की,स्वस्तिक इलेक्ट्रॉनिक्स, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलMarketबाजारEducationशिक्षण