मोबाईल दुकान फोडून १२ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:59+5:302021-02-05T06:47:59+5:30
सांगोला-राऊत मळा येथील माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या मालकीचे स्टेशन रोडवर राजाराम कॉम्प्लेक्स गाळा नं ८ व ९ मध्ये ...

मोबाईल दुकान फोडून १२ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लांबविला
सांगोला-राऊत मळा येथील माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या मालकीचे स्टेशन रोडवर राजाराम कॉम्प्लेक्स गाळा नं ८ व ९ मध्ये एस. एस. मोबाईल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. नामवंत कंपनींचे नवीन मोबाईलसह, ब्लूटूथ, स्मार्टवॉच, हेडफोन विक्रीचे दुकान मंगळवारी अज्ञात दोन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडले. यातील एकाने दुकानात प्रवेश करून सुमारे १० लाख ६९ हजार रुपयाचा मुद्देमाल तर ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे १ लाख ६२ हजार रुपयांची रोकड असा १२ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
२६ जानेवारी रोजी विजय राऊत घरी असताना स. ८.३० च्या सुमारास मित्राने फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची पाहणी केली. याबाबत विजय कुंडलिक राऊत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::::: २७पंड०१
अज्ञात चोरट्यांनी सांगोला स्टेशन रोडवरील याच एस. एस. कम्युनिकेशन ॲण्ड इलेक्ट्रॉनिक दुकानाचे शटर गॅस कटरने मध्यभागी तोडल्याचे छायाचित्र.