शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

बार्शी : भाजप समर्थक तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत याना जीवे मारण्याची धमकी फेसबुकवरून लाईव्ह केल्याचा प्रकार ...

बार्शी : भाजप समर्थक तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत याना जीवे मारण्याची धमकी फेसबुकवरून लाईव्ह केल्याचा प्रकार समोर आल्याने याबाबत बार्शी शहर पोलिसांत मुंबईतील एकजणाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत आ. राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांनी पोलिसांत आज तक्रार देताच पोलिसानी नंदू ऊर्फ बाबा पाटील (रा. पनवेल, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी भादंवि ५०७ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदला आहे. या तक्रारीत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी ३ मार्च रोजी फेसबुक लाईव्ह करून त्यात मी खूप हरामी माणूस आहे. माझ्या दाढीच्या चेहऱ्यामागे जो चेहरा आहे तो खूप कमी लोक ओळ्खतात. तुम्ही मुंबईला आल्याचे समजले तर तुम्हाला बाहेर पडू देणार नाही. कारण, खूप भाई लोकांशी संबंध आहेत. आंधळकर यांच्याविरुध्द राजकारण कराल व त्यांच्या केसाला धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. जिवंत सोडणार नाही. माझ्याविरोधात कितीही यंत्रणा लावली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे म्हणून तलवारीने मारण्याची भाषा करून धमकी दिली असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याचा पुढील तपास फौजदार शामराव गव्हाणे करत आहेत.

--------

सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करताना महाराष्ट्रभर लाखो कार्यकर्ते आम्ही जोडले आहेत. माझ्या ऑफिसवर हल्ला झाल्याचे समजताच माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

- भाऊसाहेब आंधळकर, बार्शी

----