शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलगी गेली पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 2:41 PM

सोलापुरातील घटना; पोलीसाच्या मदतीने रेल्वे स्थानक व अन्य ठिकाणी शोध सुरू

ठळक मुद्देमंगळवेढा तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडली स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्थानक व अन्य ठिकाणी शोध महिला पोलिसांनी फिर्याद दाखल केल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

मंगळवेढा : फूस लावून पळवून नेल्याप्रकरणातील अल्पवयीन मुलगी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिला पोलिसांच्या ताब्यातून पळून गेली आहे. या प्रकरणी  महिला पोलिसांनी फिर्याद दाखल केल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस पथकाने शोध घेऊन १७ जून रोजी पुणे परिसरातून आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेऊन मंगळवेढ्यात आणले होते.  या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढ्यात दाखल केल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीत निदर्शनास आले.  

पुढील उपचारासाठी त्या मुलीला मंगळवेढा येथे नेमणुकीस असलेल्या महिला कॉन्स्टेबल दीक्षा वाघमारे यांच्या ताब्यात  देऊन सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजता ती पीडित मुलगी पळून गेली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्थानक व अन्य ठिकाणी शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरPolice Stationपोलीस ठाणेSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस