शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुधदरवाढ आंदोलन पेटले; छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध

By appasaheb.patil | Updated: July 21, 2020 11:58 IST

पंढरपूर, दक्षिण सोलापूर, माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना संतप्त

ठळक मुद्दे- दूध दरवाढीसाठी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीचे आंदोलन- माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी संघटना आक्रमक- जाळपोळ, दूध रस्त्यांवर ओतले, जनावरांना दुधाची आंघोळ

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला़ सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ दर व ५ प्रतिलिटर ५ अनुदान देण्याची सुबुध्दी देण्याची प्रार्थना केली़ तुंगत गावांसह परिसरातील दुध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला़ ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालुन साकडे घातले.

यावेळी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सरपंच आगतराव रणदिवे, औदुंबर गायकवाड,  नवनाथ रणदिवे, विश्वनाथ गायकवाड,  शिरीष रणदिवे, रामकृष्ण नागणे, आविराज रणदिवे, रमेश आद, गणेश रणदिवे, श्रीकांत आवताडे आदी उपस्थित होते़ याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदविला़ दरम्यान, पंढरपूर अज्ञात एकाने रस्त्यावर टायर पेटविले.

--------------------

अंबाड येथे रस्त्यांवर ओतले दूधदूध न घेण्याची विनंती केल्यानंतरही दूध खरेदी केल्याने नेचर डिलाईट डेअरीतील दूध रस्त्यांवर ओतून अंबाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. सिध्देश्वर घुगे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

------------------

रिधोरे येथे ग्रामदैवताला अभिषेकपंढरपूर तालुक्यातील रिधोरे येथील ग्रामदैवत श्री रूद्रेश्वराला दुधाचा अभिषेक करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. दूध दरवाढ झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महावीर सावळा, सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, सत्यवान गायकवाड आदी उपस्थित होते.

----------------------

मेंढ्यांना दुधाची आंघोळमाळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. वेळापूर येथील ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दुधाने शेळ्या-मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरीagricultureशेतीMilk Supplyदूध पुरवठा