शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भीतीपोटी पंढरपुरातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:25 IST

पटवर्धन कुरोली : बिबट्यासदृश प्राण्याने बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या पालावर हल्ला करीत चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतला़ त्यानंतर घाबरलेल्या २२ ...

ठळक मुद्देबिबट्यासदृश प्राण्याचा पटवर्धन कुरोली परिसरात वावरभीमा नदीकाठच्या परिसरात सर्वाधिक उसाचे क्षेत्रवन विभागाच्या वतीने पुन्हा ठसे शोधण्याची मोहीम सुरू

पटवर्धन कुरोली : बिबट्यासदृश प्राण्याने बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या पालावर हल्ला करीत चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतला़ त्यानंतर घाबरलेल्या २२ जणांच्या ऊसतोडणी कामगारांच्या टोळीने भीतीने गुरुवारी पटवर्धन कुरोली येथून स्थलांतर केले़ दरम्यान, शुक्रवारी पुन्हा सकाळी देवडे रस्ता जवळेकर वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले़ वन विभागाच्या वतीने पुन्हा ठसे शोधण्याची मोहीम सुरू केली असली तरी प्रत्यक्षात बिबट्या की अन्य प्राणी याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

पटवर्धन कुरोली येथे बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांच्या पालावर बिबट्याने हल्ला चढवित एका मुलीचा जीव घेतला़ हे ऊसतोडणी कामगार पटवर्धन कुरोली येथे रामकृष्ण नाईकनवरे यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी आले होते़ मात्र अचानक बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या टोळीतील २२ कामगार अजूनही सावरले नाहीत़ दुसरा दिवस त्यांनी चिंताग्रस्त मन:स्थितीत काढला़ गुरुवारी सायंकाळी त्यांनी पुन्हा असाच प्रकार घडू नये, म्हणून पटवर्धन कुरोली येथून तो अर्धवट उसाचा फड सोडून स्थलांतर केले़  पटवर्धन कुरोलीत गेल्या १५ दिवसांपासून अधून-मधून काही शेतकºयांना बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन होत आहे़ मात्र वन विभाग तो प्राणी बिबट्याच असल्याचे मान्य करायला तयार नाही़ सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू आहे.

भीमा नदीकाठच्या परिसरात सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे़ शिवाय नदीकाठच्या परिसरात झाडे, झुडपे, ओढे असल्याने बिबट्यासदृश प्राणी या परिसरात वास्तव्य करीत जनावरांवर हल्ला करत आहे़ ऊसतोडणी कामगारही जिथे जागा मिळेल तेथे किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय होईल त्या ठिकाणी पाल ठोकून मुक्काम करतात. मात्र बुधवारी पालावर झालेल्या हल्ल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी ओढे, नदीकाठच्या परिसरात मुक्काम न करता लोकवस्तीच्या परिसरात राहावे, असे आवाहन विठ्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे यांनी केले.

पालावर मुले सांभाळण्यासाठी व्यक्ती- बिबट्यासदृश प्राण्याचा पटवर्धन कुरोली परिसरात वावर असल्याची चर्चा होती़ आता तर तो प्राणी वस्त्यावर हल्ले करू लागला आहे़ हे समजताच पटवर्धन कुरोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ गावातील काही जणांच्या दोन-तीन किमी अंतरावर वस्त्या आहेत़ त्या वस्त्यांवरही शेतकरी शेतात कामाला जातात़ घरी लहान मुले असतात़ ऊसतोडणी कामगारांचे असेच असते़ बुधवारी झालेल्या प्रकारानंतर शेतातील वस्त्यांवर, ऊस तोडणीच्या पालावर खास लहान मुले सांभाळण्यासाठी एक-दोन व्यक्ती आवर्जून थांबू लागल्याचे दिसून येते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने