एमएच ४५ आमचा ब्रँड आहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:17 IST2021-05-03T04:17:28+5:302021-05-03T04:17:28+5:30
जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या निवडणुकीवर अनेकांनी फोकस केला होता. यात अकलूजच्या मोहिते-पाटील व माढ्याचे शिंदे यांच्यातील रस्सीखेच ...

एमएच ४५ आमचा ब्रँड आहे !
जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या निवडणुकीवर अनेकांनी फोकस केला होता. यात अकलूजच्या मोहिते-पाटील व माढ्याचे शिंदे यांच्यातील रस्सीखेच चर्चेचा विषय ठरली. याशिवाय उमेदवारांच्या हालचालीवर ही सोशल मीडिया लक्ष ठेवून होता. कोण मतदान केंद्राबाहेर आलं कोण कपडे बदलून आलं अशा बारीकसारीक गोष्टी दिवसभर वेगाने व्हायरल होताना दिसत होत्या.
निकालाच्या शेवटच्या टप्प्यात दोन फेऱ्यांना उशीर लागल्यामुळे पुन्हा सोशल मिडीया वॉर सक्रीय झाले. मात्र अंतिम निकाल जाहीर होताच सोशल मीडियावरील तोफा थंडावल्या.
-----
असा झाला वॉर
एमएच ४५ आमचा ब्रँड आहे, आम्ही टप्प्यात आल्यावर नाही तर आणून कार्यक्रम लावतो, तीन पक्ष असताना कार्यक्रम कसा झाला, ५ टीएमसी वार्ता आधी कळायला हवी होती, आज दिवसभर कोरोना बातमी नाही, तो पिछाडीवर गेला की काय? १०५ घरी बसवले पण १०६ वा कुठं बसला... अशा प्रकारचं सोशल वॉर सोबत प्रचारावेळी नेतेमंडळींनी केलेली टीकाटिप्पणी घोषणाबाजी व आरोप-प्रत्यारोपाच्या क्लिप आज दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत होत्या.