नागणसुर येथे मनोरुग्ण महिलेचा पाण्यात पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:58+5:302021-07-07T04:27:58+5:30

अधिक माहिती अशी की, अंबिका सुनील लोकापुरे यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या मनोरुग्ण होत्या. त्यांचे सासर अक्कलकोट, ...

A mentally ill woman died after falling into water at Nagansur | नागणसुर येथे मनोरुग्ण महिलेचा पाण्यात पडून मृत्यू

नागणसुर येथे मनोरुग्ण महिलेचा पाण्यात पडून मृत्यू

अधिक माहिती अशी की, अंबिका सुनील लोकापुरे यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या मनोरुग्ण होत्या. त्यांचे सासर अक्कलकोट, तर माहेर नागणसुर आहे. ५ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता रात्री त्या घरातून निघून गेल्या होत्या. नातेवाईक श्रीशैल जेऊरे, रामचंद्र जेऊरे हे त्यांचा शोध घेत शेतातील शेततळ्याकडे गेले असता, त्या ठिकाणी त्या पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने बाहेर काढून अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉकटरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.

घटनास्थळी सपोनि तुकाराम राठोड यांनी भेट दिली. याबाबत अमोगसिद्ध जेऊरे यांनी खबर दिली आहे. अधिक तपास सपोनि राठोड करीत आहेत.

----

Web Title: A mentally ill woman died after falling into water at Nagansur