शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्यांनी जागविल्या आठवणी; साेलापूरकरांच्या प्रेमाने भारावले हाेते दिलीपकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 16:59 IST

काेहिनूरचा राैप्यमहाेत्सव, गर्ल्स स्कूलच्या निधी संकलनासाठी केली मदत

साेलापूर - भारतीय सिनेमाचा काेहिनूर दिलीपकुमार यांचे बुधवारी निधन झाले. शहरात दिलीपकुमार यांचा माेठा चाहता वर्ग आहे. या चाहत्यांसाठी ते १९६० मध्ये साेलापुरात आले हाेते. सिनेमागृहांचे मालक भागवत कुटुंबीयांसह चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले हाेते. चाहत्यांच्या प्रेमाने दिलीपकुमारही भारावल्याचे भागवत कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

भागवत कुटुंबातील अजय भागवत यांंनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून या भेटीच्या आठवणी अनेकदा ऐकल्या आहेत. या आठवणी त्यांनी ‘लाेकमत’ला सांगितल्या. काेहिनूर सिनेमाने भागवत चित्रमंदिरात २५ आठवडे पूर्ण केले हाेते. यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यासाठी दिलीपकुमार, निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चाेप्रा, अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासह सिनेमाची टीम साेलापुरात आली हाेती. भागवत चित्रपटगृहांचे जनक शंकरराव भागवत यांच्यासह त्यांचे पुत्र उमाकांत भागवत, शशिकांत भागवत, अनिल भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. समाेरच्या हाॅॅटेलमध्येच सिनेमाच्या टीमचा मुक्काम हाेता.

प्रिंटची हत्तीवरून मिरवणूक

दिलीपकुमार यांच्या चाहत्यांनी ‘मुघल-ए-आझम’ सिनेमाच्या प्रिंटची हत्तीवरून वाजत-गाजत मिरवणूक काढली हाेती. या सिनेमाच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शाे’ची तिकिटे मिळविण्यासाठी चाहते आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून भागवत चित्रपटगृहाबाहेर ठाण मांडून हाेते. पहाटे पाेलीस बंदाेबस्तही लावला हाेता.

असा कलाकार पुन्हा हाेणे नाही

नगरसेवक रियाज खरादी हे सुद्धा दिलीपकुमार यांचे चाहते. खरादी म्हणाले, उमरगा येथे १९८५ साली एका काॅलेजच्या उद्‌घाटनासाठी दिलीपकुमार आले हाेते. त्यांना पाहण्यासाठी माझ्यासह साेलापुरातील शेकडाे तरुण मिळेल त्या वाहनाने उमरग्याला पाेहाेचलाे हाेताे. काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे संस्था चालकांविरुद्ध आंदाेलन सुरू हाेते. दिलीपकुमार यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. त्यामुळे कार्यक्रम झालाच नाही, मात्र दिलीपकुमार विश्रामगृहात थांबले हाेते. या विश्रामगृहाचे प्रमुख आमचे नातेवाईक असल्याने आम्हाला दिलीपकुमार यांना भेटण्याची संधी दिली. असा कलाकार पुन्हा हाेणे नाही.

साेलापूरच्या कारीगर कुटुंबीयांशी नातं

बेगम कमरुनिस्सा गर्ल्स स्कूलच्या स्थापनेसाठी साेलापूरच्या कारीगार कुटुंबीयांनी निधी संकलनाचा निर्णय घेतला. यासाठी १९७० मध्ये दिलीपकुमार साेलापुरात आले हाेते. या संस्थेच्या सचिव रेहमा महंमद हनिफ कारीगर यांनीही दिलीपकुमार यांच्या आठवणी जागविल्या. रेहमा म्हणाल्या, आमच्या मावशीच्या छाेट्या मुलाचे दिलीपकुमार यांच्या सर्वांत लहान बहिणीशी लग्न झाले हाेते. त्यामुळे दिलीपकुमार आणि आमच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध हाेते. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीमुळेच दिलीपकुमार, महेंद्र कपूर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी निधी संकलन कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी आली हाेती. मुलींसाठी शाळा सुरू करणे खूप ‘नेक’ काम असल्याचे गाैरवाेद्गार त्यांनी काढले हाेते.

टॅग्स :SolapurसोलापूरDilip Kumarदिलीप कुमारDeathमृत्यू