बेंबळे : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याचा साठा २५ टक्क्यांपेक्षा जास्त झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याची दखल घेऊन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
उजनीतून पाणी सोडण्यासाठी आज मंत्रालयात बैठक
By admin | Updated: August 6, 2014 01:08 IST