रथोत्सवाने पयरुषण पर्वाची सांगता

By Admin | Updated: September 2, 2014 16:41 IST2014-09-02T16:41:21+5:302014-09-02T16:41:21+5:30

जैन समाजातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या पयरुषण पर्वाच्या सप्ताहानिमित्त जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने सोमवारी सकाळी श्हराच्या प्रमुख मार्गावरुन रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

Meet the Rathotsav, meet the guests | रथोत्सवाने पयरुषण पर्वाची सांगता

रथोत्सवाने पयरुषण पर्वाची सांगता

सोलापूर : जैन समाजातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या पयरुषण पर्वाच्या सप्ताहानिमित्त जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने सोमवारी सकाळी श्हराच्या प्रमुख मार्गावरुन रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.
जोडभावी पेठेतील श्री आदेश्‍वर भगवान मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मुनीराज रवींद्र विजयजी यांच्या अधिपत्याखाली ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत इंद्रध्वज, बँण्ड, विविध वेशभूषा केलेले नऊ घोडेस्वार, मेरी आवाज सुनो बँण्ड पथक, बग्गीत नऊ उपवास केलेल्या सीमा शहा, आठ उपवास केलेले मोनम पारेख, अचिरा गोसर, मिनल पटणी, शीतल शहा, वंदना शहा, मंजू जैन बसल्या होत्या.
भगवानांची मूर्ती घेऊन सठियाबाई मकाणा, सुमन सकलेचा, विमी सकलेचा, कुजल देडिया बग्गीत बसल्या होत्या. मिरवणुकीत डोक्यावर कलश घेतलेल्या मरुदेवा बालिका मंडळ, राजेंद्र महिला मंडळाच्या बालिका व महिला सहभागी झाल्या होत्या. ही मिरवणूक जोडभावी पेठ, कुंभार वेस, पश्‍चिम मंगळवार पेठ, पोलीस चौकी, चाटी गल्ली, बाळीवेस, सम्राट चौक, शिवाजी चौक, मेकॅनिकी चौकमार्गे निघून भगवान शांतीनाथ मंदिरात विसजिर्त करण्यात आली.
या मिरवणुकीत गौरीलाल वेद, मोतीलाल सोनीमिंडे, तिलोकचंद मुनोत, कल्पेश मालू, गौतमचंद वेद, राजेंद्र कांसवा, सुभाष लोणावत, जयचंद वेद, जवाहरलाल मुनोत, जीवन शिंगवी, तिलोकचंद वेद, धन्यकुमार खाबे, तिलोकचंद बोथरा, सागरमल मांडोत, गिरीष गांधी, गौतम संचेती, बाबूभाई मेहता, तिलोकचंद्र निमाणी, पद्मचंद राका, चेतन संघवी, रुपचंद सकलेचा, रमेश बंब, महावीर मेहता, मोहनलाल छाजेड, दीपक मुनोत, महेश भंडारी, रमेश जैन, प्रकाश कोठारी, संजय सेठिया, रुपचंद सकलेचा, महेंद्र पोरवाल, विठ्ठलराव पोटाबत्ती, संजय भन्साळी, कांतीलाल कांकरिया, प्रकाश डाकलिया, प्रकाश वेद, पुसालाल कोचर, मोहन लोडा, अशोक राका, शैलेश पोरवाल, टिकम वेद आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Meet the Rathotsav, meet the guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.