शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष सुखा-समाधानाचे जाऊ दे! भाविकांच्या गर्दीने राज्यातील लहान-माेठी तीर्थक्षेत्रे गजबजली; दर्शनासाठी लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:15 IST

पंढरपूर, अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

सोलापूर : वर्षअखेरीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर, अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोन्ही ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  पंढरपुरात मागील आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच रविवारची सुटी, वर्षअखेर, नवीन वर्षाचे स्वागत व श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची संख्या वाढत आहे. यामुळे विठ्ठल मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. 

आठ दिवसांत पंधरा लाख जणांनी घेतले शनिदर्शन नेवासा (जि. अहमदनगर) : नाताळ सणाची सुटी, नवीन वर्षानिमित्त श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे गेल्या आठ दिवसांत पंधरा लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता शनैश्वर देवस्थानने वर्तविली आहे.नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रविवारी दिवसभरात तीन लाखांहून अधिक भाविकांनी शनिदर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता. 

साईनगरीत साईनामाचा जल्लोष; भक्तिरसाची उधळणशिर्डी : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साईंच्या साक्षीने व त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देश-विदेशातील भाविकांनी साईनगरीत गर्दी केली. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साईनामाच्या गजराने व फटाक्यांच्या आतषबाजीने साईनगरीचा आसमंत उजळून निघाला.       नववर्षाचे स्वागत शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साईनगरीत येत असतात. ३१ डिसेंबरच्या रात्री मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. दुपारनंतर भक्तांचा ओघ वाढला.

अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात भक्तांचा ओघ कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देताना कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यातच थर्टी फर्स्टमुळे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात गर्दीमुळे परिसरातील लॉज, हॉटेल फुल्ल झाली. विशेष म्हणजे, रविवारी शहरातील प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठीही नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. गर्दीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

टॅग्स :New Yearनववर्षTempleमंदिर