शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पुणे अन्‌ बळ्ळारी येथून सोलापुरात पोलीस बंदोबस्तात २७ मे टन ऑक्सिजन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:35 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : पुणे अन्‌ बळ्ळारी येथून प्राणवायूचे आगमन

सोलापूर : पुणे येथून १५ मे. टन तसेच बल्लारी येथून १२ मे. टन असे एकूण सत्तावीस मे. टन ऑक्सिजन सोमवारी सोलापुरात दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

विशेष म्हणजे पुणे येथून ऑक्सिजन सोलापुरात आणताना ऑक्सिजनची पळवापळवी होऊ नये, याकरिता जिल्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विशेष दक्षता घेतली आहे. त्यांनी ऑक्सिजन टँकर मागे पोलिसांचा बंदोबस्त लावला. तसेच माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनाही टँकरच्या मागावर तैनात केले. जगदीश निंबाळकर हे सोमवारी पुण्यात ठाण मांडून ऑक्‍सिजनचा टँकर सोलापुरात आणला. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना सोमवारी सोलापुरात तब्बल २७ टन ऑक्सिजन दाखल झाले आहे.

शंभरकर यांनी सांगितले, परजिल्ह्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी पूर्वी एक टँकर उपलब्ध होता. तो दहा टनांचा होता. आता दुसरे एक टँकर राज्य शासनाकडून अधिग्रहण करून मिळाले आहे. दोन्ही टँकर प्रत्येकी दहा टन क्षमतेचे आहेत. त्यामुळे आता २० टन क्षमता असलेले दोन टँकर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या हॉस्पिटलकडून देखील ऑक्सिजन मागवले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही टँकरमधून रोज पुणे आणि बल्लारी येथून मुबलक ऑक्सिजन आणता येईल. तसे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून झाले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत ऑक्सिजनचा तुटवडा पूर्णपणे कमी होऊन जाईल. त्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. कोणत्या रुग्णाला किती ऑक्सिजन दिला. त्याचे ऑडिट करण्याच्याही सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा असा

  • अश्विनी हॉस्पिटल- ७ मे. टन
  • मार्कंडेय रुग्णालय- ५ मे. टन
  • सिव्हिल हॉस्पिटल- ५ मे. टन
  • गंगामाई हॉस्पिटल- ३ मे. टन
  • इतर हॉस्पिटल- ७ मे. टन
टॅग्स :SolapurसोलापूरOxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल