महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीत पुन्हा दगडांचा बेसुमार उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:52+5:302021-07-08T04:15:52+5:30
सिन्नूर येथील जमिनीतून यापूर्वी बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करून खडी तयार करीत असल्याची खबर महसूल विभागाला मिळाली होती. त्यावरून तहसीलदार ...

महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीत पुन्हा दगडांचा बेसुमार उपसा
सिन्नूर येथील जमिनीतून यापूर्वी बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करून खडी तयार करीत असल्याची खबर महसूल विभागाला मिळाली होती. त्यावरून तहसीलदार अंजली मरोड यांनी घटनास्थळी भेट देऊन दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी सातबारा उताऱ्यावर ९४ लाख ६७ हजार २६ रुपयांचा बोजा चढवला होता. तसेच सील करण्यात आले होते. आठ दिवसांपासून पुन्हा सील काढून पूर्ववत ब्लास्टिंगद्वारे दगडाचे उत्खनन करून खडी तयार केली जात आहे. यामुळे शासनाने दररोज लाखो रुपयांचे महसूल बुडत आहे.
----
महाराष्ट्र- कर्नाटक हद्दीत अफझलपूरकडे जाताना डाव्या बाजूला रोडपासून ३०० मीटर अंतरावर लक्ष्मीपूत्र महादेव जमादार यांची १ हेक्टर ६१ आर जमीन आहे. गट नंबर ७२/२ असा आहे. यापूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार कायदेशीर कारवाई केली आहे. उत्खननाचे मोजमाप करुन रॉयल्टी दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ९४ लाख, ६७ हजार ०२५ रुपयाचे बोजा चढविण्यात आला आहे.
----
दगडाचे विनापरवाना उत्खनन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून कारवाईसाठी तलाठ्यांना पाहणीसाठी पाठवून दिले होते. तिथे कोणी आढळून आले नाही. मात्र नव्याने ब्लास्टिंगद्वारे दगडाचे उत्खनन होत असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत येत्या दोन दिवसांत तहसीलदारांना अहवाल देण्यात येणार आहे.
- सुभाष धर्मसाले, मंडल अधिकारी
---
फोटो : ०७ अक्कलकोट
ओळ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ब्लास्टिंगच्या माध्यमातून दगड काढत असलेले मशीन दिसत आहे.