पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

By Admin | Updated: July 7, 2014 01:02 IST2014-07-07T01:02:30+5:302014-07-07T01:02:30+5:30

वाहने ढकलून केला निषेध : बैलगाडी, टांग्यातून रॅली

The mass movement of the Congress against petrol and diesel price hike | पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे जनआंदोलन


सोलापूर : केंद्र शासनाने खोटे आश्वासन देऊन जनतेचा भ्रमनिरास करीत पेट्रोल व डिझेल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. बैलगाडी, टांग्यातून काढलेल्या रॅलीत वाहने ढकलून निषेध करण्यात आला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव धर्मा भोसले, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, नगरसेवक देवेंद्र भंडारे, मधुकर आठवले, उदयशंकर चाकोते, विनोद गायकवाड, पैगंबर शेख, दत्तात्रय बंदपट्टे, महिला अध्यक्षा प्रा. ज्योती वाघमारे, युवक अध्यक्ष अमोल शिंदे, सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी, एनएसयुआय अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष माणिकसिंग मैनावाले, सिद्धाराम चाकोते, डॉ. साहेबराव गायकवाड, जाबीर अल्लोळी, संजय बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख सातलिंग शटगार, बाबा करगुळे, पांडुरंग चौधरी, अर्जुन साळवे, केदार उंबरजे, नरसिंग कोळी, जेम्स जंगम, माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव, हणमंतू सायबोळू, आशाताई म्हेत्रे, वाहिद नदाफ, बजरंग जाधव, आझम सैफन, प्रा. नरसिंह आसादे, नारायण जाधव, गंगाधर गुमटे, अंबादास गुत्तीकोंडा, विश्वनाथ साबळे, लालचंद वाधवानी, पुरूषोत्तम गायकवाड, गुलाब बारड आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश यलगुलवार म्हणाले की, मोदी सरकारने जनतेला ‘अच्छे दिन आने वाले है’ असे स्वप्न दाखवले होते. त्यांनी महागाईत वाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अच्छे दिनऐवजी बुरे दिन येत आहेत.
आंदोलनात जयप्रकाश पल्ली, अरूण नंदूरकर, विनोद भोसले, रमेश लांबतुरे, मनीष गडदे, रूस्तुम कंपली, राजन कामत, केशव इंगळे, राहुल वर्दा, हेमा चिंचोळकर, अनिल मस्के, रोशन पठाण, करीम शेख, मनोज यलगुलवार, उपेंद्र ठकार, तिरूपती परकीपंडला, परशुराम सतारवाले, राहुल गोयल, सूर्यकांत शेरखाने, सिद्राम अट्टेलूर, रामसिंग दवेवाले, गौतम भांडेकर, तुकाराम जाधव, द्वारकादास तावणीया, बशीर शेख, शुकूर शेख, वैशाली गवळी, अपर्णा कोळी, नंदा कांगरे, नागनाथ वाघमारे, नागनाथ कासलोलकर, समीर शेख, जयबून बेसकर, वीणा देवकते, कोंडण काकडे, वासंती भस्मे, मीनाक्षी पवार, अंबिका देढे, संघमित्रा चौधरी, एन.के.क्षीरसागर, सोपान थोरात, उस्मान मनियार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
-------------------------------
अनोखे आंदोलन
वाहने ढकलण्याच्या या कार्यक्रमात तीन बैलगाडी, एक टांगा आणि असंख्य दुचाकी वाहनांचा समावेश होता. डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून, डफरीन चौक, महापौर निवास मार्गे रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला.

Web Title: The mass movement of the Congress against petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.