शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Marriage: हुंडा देण्याची वेळ नवरदेवावर, 'लग्नाळू' युवकांची गावागावात हीच व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:31 IST

ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊनही लग्न जमत नसल्याची मोठी समस्या पुढे आली आहे. याबद्दल आता युवक आणि त्याचे पालकही पुढे येऊन प्रतिक्रिया देत आहेत.

सोलापूर/करमाळा : पूर्वी नवरी मुलीकडून नवऱ्या मुलास हुंडा देण्याची पद्धत रूढ होती. परंतु, आता ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊन सुद्धा मुली मिळत नसल्याने मुलाकडून मुलीच्या कुटुंबीयांना हुंडा देण्याची वेळ आली आहे. शिवाय स्व:च्या जातीमधील मुली मिळत नसल्याने अंतरजातीय मुलींचा शोध घेण्याची वेळ पालकावर आली आहे. आपल्या राज्यात मुली मिळाल्या नाही तर परप्रांतात जाऊन विवाह करून यातून फसगत झाल्याची उदाहरणे घडली आहेत. 

ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊनही लग्न जमत नसल्याची मोठी समस्या पुढे आली आहे. याबद्दल आता युवक आणि त्याचे पालकही पुढे येऊन प्रतिक्रिया देत आहेत. मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनत चालली आहे.  माझे वय रनिंग चाळीस आहे. आमच्या समाजात एक तर मुलींची संख्या कमी आहे शिवाय मुलगा नोकरीला आहे का, तो शहरात आहे का अशी विचारणा होत असल्याने मी अद्याप ही लग्नाविना राहिलेलो आहे. आता नाईलाजाने मला आंतरजातीय विवाह करण्यापलीकडे दुसरा मार्ग दिसत नाही. 

हर्षद मंत्री, अविवाहित तरुण करमाळा 

हल्लीच्या मुली पुणे मुंबई सारख्या शहरात संसार करणे पसंत करीत आहेत. शहरातील आकर्षक संस्कृती व चंगळवादास प्रथम प्राधान्य दिले जात असुन ग्रामीण भागात शेतीत मुलींचे मन रमत नाही मुलींची मानसिकता पालकांनी बदलणे गरजेचे आहे.

दिपक पाटणे,औषध विक्रेता करमाळा. 

सुशिक्षीत व उच्चभ्रू जाती-धर्मांमध्ये मुलींची संख्या मुलापेक्षा कमी आहे.वय होऊन ही लग्नासाठी मुली मिळत नाहीत यामुळे मुलींची चाँईस वाढली आहे.नोकरदार,शहरात राहणारा व आई-बापा पासुन वेगळा राहणा-या मुलांना पसंती दिली जात आहे. ग्रामीण मागात शेतक-यांच्या मुलाला मुलगु लग्णासाठी मिळत नाही.

विनोद गांधी,व्यापारी करमाळा कोट घेणे... 

वय होऊन सुद्धा लग्नगाठ बांधली जात नसल्याने कर्नाटक, मध्य प्रदेश या परप्रांतात जाऊन लग्नाच्या मुलींचा शोध घेण्यासाठी फिरावे लागत आहे. लग्न जमविणारे मध्यस्थांना चहापाणी करून मानधन द्यावे लागत आहे. पसंत असलेल्या मुलीच्या कुटुंबियांना लाख- दोन लाख रुपये हुंडा देऊन मुलीशी विवाह करून घरी आणाल्याची कित्तेक उदाहरणे आहेत.

हमीद बागवान, भेळ विक्रेता करमाळा

टॅग्स :marriageलग्नSolapurसोलापूर