अपहरण करून विवाहितेवर बलात्कार
By Admin | Updated: June 22, 2014 00:58 IST2014-06-22T00:57:43+5:302014-06-22T00:58:03+5:30
विवाहितेस रिक्षातून पळवून नेऊन बऱ्हाणपूर येथे बलात्कार

अपहरण करून विवाहितेवर बलात्कार
सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील शोभादेवी नगरातून विवाहितेस रिक्षातून पळवून नेऊन बऱ्हाणपूर येथे बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला.
पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून वसीम पीरजादे, जहाँगीर पीरजादे (दोघे रा. बऱ्हाणपूर, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहिता ही ८ जून रोजी रात्री घरात झोपली होती. पहाटे साडेपाच वाजता आरोपी वसीम याने कडी वाजवून तिला उठविले. घरात घुसून त्याने तिचे तोंड दाबून धरले व बाहेर आणून रिक्षात बसवून अक्कलकोट येथे नेले. तेथे फोन करून जहाँगीर याला बोलावून घेतले. त्याच्या मोटरसायकलवरून बऱ्हाणपूर येथे नेले. तेथे वसीम याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या ताब्यातून सुटका झाल्यावर तिने वळसंग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास केला असता, घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. २० जून रोजी सायं़ गुन्हा वर्ग झाल्याची नोंद घेतली. तपास महिला फौजदार पौळ करीत आहेत.