सकाळी लग्न अन् पहाटेच तरुणीची सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या
By विलास जळकोटकर | Updated: December 18, 2023 16:23 IST2023-12-18T16:22:38+5:302023-12-18T16:23:39+5:30
कुमठे परिसरातील ओमनमोशिवाय नगरातील तरुणीचे सोमवारी ११:३० च्या सुमारास शहरातील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा ठरला होता.

सकाळी लग्न अन् पहाटेच तरुणीची सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर : मोठ्या धामधुमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लग्नसोहळा ठरलेला. दारामध्ये मांडव सजलेला असतानाच लग्न ठरलेल्या २५ वर्षीय तरुणीनं पहाटेच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार ओमनमोशिवाय नगर, कुमठे येथे सोमवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकाला जबाबदार असणाऱ्या तिघांवर कारवाई करुन अटकेची मागणी तरुणीच्या पित्याने पोलिसांकडे केली आहे.
कुमठे परिसरातील ओमनमोशिवाय नगरातील तरुणीचे सोमवारी ११:३० च्या सुमारास शहरातील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा ठरला होता. त्यापूर्वीच या तरुणी राहत्या घरी बेडरुममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. पहाटे ५:४५ च्या सुमारास ही घटना उघडकीस येताच तातडीने पोलिसांना खबर देऊन बेशुद्धावस्थेत तिला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार ए. एन. गावडे यांनी दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
आरोपींच्या अटकेची मागणी
या साऱ्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कठोर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तरुणीच्या पित्याने पोलिसांकडे केली आहे.