वाढेगावात विवाहितेचा छळ<bha>;</bha> घरातून हाकलले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST2021-02-17T04:28:02+5:302021-02-17T04:28:02+5:30

सांगोला : मुलगी झाल्याच्या कारणावरुन सुनेचा जाचहाट करीत घरातून हाकलून दिल्याचा प्रकार सांगोला तालुक्यात वाढेगाव येथे घडला. याबाबत ...

Marriage harassment in Wadhegaon <b> bha;; </bha> evicted from home, crime against three including husband | वाढेगावात विवाहितेचा छळ<bha>;</bha> घरातून हाकलले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

वाढेगावात विवाहितेचा छळ<bha>;</bha> घरातून हाकलले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

सांगोला : मुलगी झाल्याच्या कारणावरुन सुनेचा जाचहाट करीत घरातून हाकलून दिल्याचा प्रकार सांगोला तालुक्यात वाढेगाव येथे घडला. याबाबत पूजा राकेश जावीर या विवाहितेने सांगोला पोलीस ठाणे येथे पतीसह तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.

पूजाचा विवाह १० जून २०१४ रोजी झाला होता. त्यानंतर लग्नात हुंड्यापोटी राहिलेले लाख रुपये, मोटरसायकल देण्याच्या कारणावरून पती, सासू, दिर नणंद व नंदवा अशा पाच जणांनी मिळून तिला व तिच्या मुलीला शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सुनेला नातीसह घरातून हाकलून दिले. त्यानंतर विवाहितेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी पती राकेश दादासाहेब जावीर, सासू जयश्री जावीर, दीर प्रशांत जावीर (सर्व रा. वाढेगाव) तसेच नणंद प्रतिभा अनिल करडे, तिचा नवरा अनिल बापू करडे (दोघे रा.हजारे वस्ती नंबर ४, दिघेवाडी, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Marriage harassment in Wadhegaon bha;; evicted from home, crime against three including husband