विवाहाच्या आहेराची रक्कम गरीबांच्या भोजनासाठी
By Admin | Updated: January 25, 2017 16:57 IST2017-01-25T16:57:29+5:302017-01-25T16:57:29+5:30
समाजातील अनाथ वृद्धांसाठी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने लोकमंगल अन्नपूर्णा योजना सुरु आहे. आज अकोलेकाठी येथील बाळासाहेब पाटील यांच्या सुपुत्राच्या

विवाहाच्या आहेराची रक्कम गरीबांच्या भोजनासाठी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 25 - समाजातील अनाथ वृद्धांसाठी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने लोकमंगल अन्नपूर्णा योजना सुरु आहे. आज अकोलेकाठी येथील बाळासाहेब पाटील यांच्या सुपुत्राच्या विवाहाप्रसंगी आहेर म्हणून मिळालेल्या पैशातून पाटील कुटुंबियांनी लोकमंगल अन्नपूर्णा योजनेस तब्बल १० हजार ११० रुपयांचे धान्य व वस्तू स्वरुपात देणगी दिली.
लोकमंगल फाउंडेशन गेली चार वर्ष सातत्याने समाजातील निराधार वृद्ध आजी आजोबांना दोन वेळेचे भोजन या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून देत आहे. ८ मार्च २०१३ रोजी सुरु झालेली ही योजना आता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या व लोकमंगलच्या सहकार्याने हि योजना अविरतपणे सुरु आहे. सध्या सोलापूर शहरात व उस्मानाबाद मध्ये मोफत ३७० डबे घरपोच दिले जात आहेत.
१९ जानेवारी रोजी आकोले मंद्रूपच्या बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र संजय यांचा विवाह पार पडला. त्यावेळी त्या समारंभात आलेल्या पाहुण्यांनी आहेर म्हणून दिलेली आर्थिक भेट त्यांनी या लोकमंगलच्या योजनेस मदत म्हणून दिली आहे. गहू, तांदूळ, तेल, मीठ, भाजीपाला व तत्सम वास्तुस्वरुपात ही मदत त्यांनी लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला भेट देऊन सुपूर्द केली.