करडईसाठी मंगळवेढ्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST2021-09-17T04:27:47+5:302021-09-17T04:27:47+5:30
मुंढेवाडी (ता मंगळवेढा) येथे कृषी विभाग व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने करडई बीजोत्पादन कार्यक्रम चर्चासत्र आयोजित केले होते. त्याप्रसंगी ...

करडईसाठी मंगळवेढ्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार
मुंढेवाडी (ता मंगळवेढा) येथे कृषी विभाग व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने करडई बीजोत्पादन कार्यक्रम चर्चासत्र आयोजित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गोपाळकृष्ण देवरमनी, प्रमोद भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे,मंडळ कृषी अधिकारी मारुती कौलगे, मुंढेवाडीचे शिवाजी पाटील, सिद्धेश्वर धसाडे, लक्ष्मण धसाडे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक देवरमणी यांनी करडई बीजोत्पादन कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी यांनी सहभाग घ्यावा. बाजार भावाच्या मागील ३ वर्षी सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक दर मिळवावा, असे आवाहन केले.
कृषी सहायक प्रशांत काटे यांनी सुधारित करडई उत्पादन तंत्रज्ञान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन चर्चासत्र, शेतीशाळा आयोजित केल्या जातील असे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहायक प्रशांत काटे, विक्रम भोजने, पवन पाटील, शैलेंद्र पाटील, विक्रम सावजी यांनी परिश्रम घेतले. यावेळी कृषिधन गटाचे शिवाजी धसाडे, माधवानंद पाटील, पांडुरंग पाटील, विकास ठेंगील व शेतकरी उपस्थित होते.
-----
मुंढेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, मारुती कौलगे, शिवाजी पाटील, सिद्धेश्वर धसाडे, प्रशांत काटे, गोटू पाटील, सचिन पाटील.
----
160921\img-20210915-wa0092-01.jpeg
फोटो ओळी-- मुंढेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे , मारुती कौलगे, शिवाजी पाटील,सिद्धेश्वर धसाडे ,प्रशांत काटे, गोटू पाटील, सचिन पाटील