शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

मार्कंडेय महामुनींचा जयजयकार

By admin | Updated: August 11, 2014 01:12 IST

रथोत्सवात लोटला भक्तीसागर : दर्शनासाठी मंदिरात सोलापूरकर भाविकांची गर्दी

सोलापूर : महर्षी मार्कंडेयांचा जयजयकार करीत पद्मशाली समाजातील बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांनी रविवारी मार्कंडेयांचा रथोत्सव अगदी भक्तिभावाने साजरा केला. लेझीमचा एक ताल-एक सुरात खेळ, हिंदी, मराठी, तेलुगू चित्रपटांमधील गाण्यांच्या तालावर नृत्य अन् शक्तीचे प्रयोग सादर करीत विविध मंडळांनी रथोत्सवाच्या मिरवणुकीत अधिकच रंग भरला. दरम्यान, विजापूर वेस येथील श्री मार्कंडेय मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रथोत्सवात लोटलेल्या भक्तिसागरात भाविकही तल्लीन होऊन गेले होते. मार्कंडेय मंदिरात रविवारी पहाटे ५ वाजता गणेशपूजा करण्यात आली. त्यानंतर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी ७ वाजता पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते पद्मध्वजारोहण करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता गुंडला परिवाराने मार्कंडेय रथाची विधिवत पूजा केली. पद्मशाली पुरोहित संघम्चे अध्यक्ष नरेंद्र श्रीमल, नरसिंग कंदीकटला यांनी पौरोहित्य केले. आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक महेश कोठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, साईनाथ बिर्रु, लक्ष्मीकांत सरगम, माजी नगरसेवक उमेश मामड्याल, ज्ञाती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्कंडेय मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. मंदिरापासून निघालेल्या रथोत्सवाची मिरवणूक भारतीय चौक, शनिवार पेठ, रत्नमारुती मंदिर, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, कुचन नगर, आंध्र दत्त चौक, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, श्री मार्कंडेय चौक, राजेंद्र चौक, भुलाभाई चौक, नेताजी नगर, चाटला कॉर्नर, जोडभावी पेठ, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, शंकरलिंग देवस्थान, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेस मार्गे काढण्यात आली. रात्री उशिरा मार्कंडेय मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. मिरवणुकीत खास रंगाच्या पोषाखात कलाकार विविध गाण्यांच्या तालावर नृत्य करताना दिसत होते. भवानी पेठेतील ऋषीकेश डान्स ग्रुप, कुंभारीच्या विडी घरकूलमधील टीआरजी डान्स ग्रुप, यंग चॅलेंज डान्स ग्रुप, बी. आर. डान्स ग्रुप, नीलम नगरातील विघ्नेश्वर डान्स ग्रुप, जय मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, मार्कंडेय प्रतिष्ठान, गोवर्धन डान्स ग्रुप, साई समर्थ डान्स ग्रुप, कलावती नगरातील सिद्धी डान्स ग्रुपने एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करीत उपस्थितांकडून दाद मिळवली. आरकाल मित्र परिवाराचे कार्यकर्ते बेधुंद होत नृत्य करताना वातावरण भारावून गेले होते. महेश कोठे युवा मंचचा लेझीम पथक साऱ्यांच्या नजरेत भरत होता. एक ताल-एक सुरात चाललेला हा खेळ पाहण्यासाठी चौकाचौकांमध्ये गर्दी होत होती. तेलंग पाच्छा पेठेतील विवेकानंद शक्तीप्रयोग, जयशंकर शक्तीप्रयोग, लक्ष्मी नृसिंह स्वामी झोपडपट्टीतील कर्ण मित्रमंडळाच्या शक्तीप्रयोग मंडळाचे कार्यकर्ते धाडसी प्रयोग सादर करताना पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. मुळेगाव रोडवरील विडी घरकूलमधील श्रद्धा गणपती मंडळाने मिरवणुकीत हलता देखावा सादर केला. चांदीचा मुलायम देण्यात आलेल्या रथामध्ये मार्कंडेय मुनींची मूर्ती साऱ्यांच्याच नजरेत भरत होती.