विवाहितेची आत्महत्या : पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST2021-02-11T04:24:25+5:302021-02-11T04:24:25+5:30

वैराग : जवळगाव (ता. बार्शी) येथे चारित्र्याच्या संशयावरून आणि वाहन घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणत नसल्याने शारीरिक ...

Marital suicide: Crime against husband, mother-in-law | विवाहितेची आत्महत्या : पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा

विवाहितेची आत्महत्या : पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा

वैराग : जवळगाव (ता. बार्शी) येथे चारित्र्याच्या संशयावरून आणि वाहन घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणत नसल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. याला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्याविरोधात वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुकेशनी महादेव कापसे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पती महादेव भागवत कापसे, सासरे भागवत कापसे आणि सासू मुक्ताबाई कापसे (रा. जवळगाव, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आठ वर्षांपूर्वी नरसिंग जगताप (रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर ) यांच्या मुलगीचा महादेव कापसे याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू झाला. याबाबत तिने फोनवरून वडिलांना याची माहिती दिली होती. बुधवारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे करीत आहेत.

----

फोटो : १० सुकेशनी

Web Title: Marital suicide: Crime against husband, mother-in-law