मराठी चित्रपटांचे डिसेंबरमध्ये पुण्यात संमेलन
By Admin | Updated: August 21, 2016 17:31 IST2016-08-21T16:46:08+5:302016-08-21T17:31:01+5:30
मराठी नाट्य आणि साहित्य संमेलनाच्या धर्तीवर मराठी चित्रपटांचे पहिले संमेलन डिसेंबरमध्ये पुणे येथे आयोजित करण्यात येईल,अशी घोषणा

मराठी चित्रपटांचे डिसेंबरमध्ये पुण्यात संमेलन
रवींद्र देशमुख ,
सोलापूर, दि. २१ - मराठी नाट्य आणि साहित्य संमेलनाच्या धर्तीवर मराठी चित्रपटांचे पहिले संमेलन डिसेंबरमध्ये पुणे येथे आयोजित करण्यात येईल,अशी घोषणा चित्रपट महामंडाळाचे अध्यक्ष मेघराज भोसले आणि खजिनदार वर्षा उसगावकर यांनी आज येथे केली. नवीन निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकारांसाठी हे संमेलन मार्गदर्शक ठरणार आहे. संमेलनाच्या तारखा लवकरच निश्चित होतील. स्थानिक संस्थेच्या सहकार्याने संमेलन घेतले जाईल, असेही ते म्हणाले.