शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण म्हणजे अर्धेपोट जेवण; सोलापुरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:45 IST

नेत्यांच्या प्रतिक्रिया : फक्त सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाचा समावेश

ठळक मुद्देस्वतंत्र आरक्षण जाहीर करून समाजाची फसवणूक केली - राम गायकवाड मराठा आरक्षणाबाबत केलेली ही नवी घोषणा  फसवी आहे - दिलीप कोल्हे जेवायला बोलावून अर्धेपोट भरेल इतके जेवण देण्यासारखे ही घोषणा - मनोहर सपाटे

सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी रविवारी घोषित केलेल्या‘ एसईबीसी’ (सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग) या तरतुदीत फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा समावेश केला आहे, अशी टीका मराठा समाजातील नेत्यांनी केली आहे . जेवायला बोलावून अर्धेपोट जेवण देण्यासारखी ही घोषणा आहे, अशीही टीका करण्यात आली.

सोलापुरातील मराठा आरक्षणासाठी आघाडीवर लढणारे माऊली पवार म्हणाले की, ९  आॅगस्ट २०१७ रोजी मराठा समाजाने मोर्चा काढल्यावर मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक सवलतीबाबत घोषणा केल्या होत्या; पण आजपर्यंत पदरात काहीच पडले नाही. आता ही मुख्यमंत्र्यांनी नवी घोषणा केली आहे.

घोषणाऐवजी त्यांनी येणाºया हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत कायदा केला तर बरे होईल. माजी महापौर मनोहर सपाटे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या एसईबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा समावेश नाही फक्त सामाजिक व शैक्षणिक गोष्टीसाठी आरक्षण असे नमूद केले आहे.  भारतीय संविधानातील ज्या कलमांचा उल्लेख केला आहे, त्यात हे बसत नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी वाटते. जेवायला बोलावून अर्धेपोट भरेल इतके जेवण देण्यासारखे ही घोषणा आहे. त्यामुळे या घोषणेबाबत मराठा समाज समाधानी होणार नाही.

अहवालात मराठा समाजात ६० टक्के आरक्षण असल्याचे नमूद केले आहे;  पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांची घोषणा पाहिल्यावर केवळ सामाजिक आणि शैक्षणिक कारणांसाठीच आरक्षण देण्यात येत आहे, असे दिसते. याचा नोकरीत फायदा होणार नाही, असे दिसून येत आहे. यामध्ये आर्थिक मागासलेपणा हा शब्दही घालणे गरजेचे आहे. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे याबाबत बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेली ही नवी घोषणा  फसवी आहे, मराठा समाजाला दिलेले हे नवीन                  आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर त्यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण  द्यावे, यामध्ये कोर्टाची अडचण  राहणार नाही. ‘एसईबीसी’ जो  नवीन पर्याय काढलेला आहे तो कायद्याच्या परीक्षेत  पास होणार नाही असे वाटते.

भविष्यात टिकेल का नाही, हे सांगणे अवघड - मराठा सेवा संघाचे राम गायकवाड म्हणाले, आज मुख्यमंत्री मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जाहीर करून समाजाची फसवणूक केली आहे. मराठा समाजाचाच कुणबी हा घटक ओबीसी संवर्गात गणला जात असताना, याचे अनेक कायदेशीर पुरावे राज्य मागास आयोगाकडे निवेदनाद्वारे प्राप्त झाले असतानाही सरकारने मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात का समावेश केला नाही हे कळत नाही. हे आरक्षण भविष्यात टिकेल का नाही हे सांगणे अवघड आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण