शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण पुन्हा पेटले; ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:30 IST

सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन; टायर पेटवून व्यक्त केला संताप

ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाजामिनावर सुटलेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला बाळे येथील उड्डाणपूल गाठला रस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी सुरू केली. रस्त्यावर वाहने थांबली

सोलापूर : शांततेच्या मार्गाने राज्यभर मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात आले. अनेकांना यात हौतात्म्य पत्करावे लागले. त्यातून आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला. मराठा बांधव सुखावला. मात्र नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्याने सबंध जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अनेकांनी तत्कालीन सरकारवर टीकास्त्र सोडले तर काहींनी विद्यमान सरकारने या ज्वलंत विषयाबद्दल गांभीर्य दाखविले नसल्याच्या भावना सर्वच स्तरातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. केवळ राज्य सरकारचीच नव्हे तर केंद्र व राज्य सरकारांनी मिळून हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी असल्याचा सूरही अनेकांनी व्यक्त केला. काही झालेतरी आरक्षण मिळाले पाहिजे. शासनाकडून लवकरच अध्यादेश काढायला हवा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ‘एक मराठा-लाख मराठा’चा आवाज देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अवंतीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी बाळे येथील पुलावर टायर जाळून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. काही कार्यकर्ते या चौकात जमले तर राम जाधव, किरण पवार, अजिंक्य पाटील, निखिल थोरात, राहुल दहीहंडे, सौदागर क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सकाळी साडेदहाच्या सुमाराला अवंतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. या ठिकाणी आधीपासूनच पोलीस थांबले होते. कार्यकर्त्यांनी टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

जय जिजाऊ-जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. दुपारी सर्व कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.जामिनावर सुटलेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला बाळे येथील उड्डाणपूल गाठला. रस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी सुरू केली. रस्त्यावर वाहने थांबली. वाहनांची रांग जुन्या बोरामणी नाक्यापर्यंत होती. पोलिसांनी पुन्हा कार्यकर्त्यांची धरपकड केली. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलने करुन आपला संताप व्यक्त केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा