पोलीस कोठडीत असलेल्या मनोहरमामाला लागलाय खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:54+5:302021-09-24T04:25:54+5:30

उंदरगावचा भोंदूबाबा मनोहरमामा भोसले पीडित महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यात करमाळा पोलीस ठाण्यात अटकेत आहे. बारामती पोलिसांकडून मनोहरमामाला रविवारी ताब्यात घेऊन ...

Manoharmama, who is in police custody, started coughing | पोलीस कोठडीत असलेल्या मनोहरमामाला लागलाय खोकला

पोलीस कोठडीत असलेल्या मनोहरमामाला लागलाय खोकला

उंदरगावचा भोंदूबाबा मनोहरमामा भोसले पीडित महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यात करमाळा पोलीस ठाण्यात अटकेत आहे. बारामती पोलिसांकडून मनोहरमामाला रविवारी ताब्यात घेऊन करमाळा पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर उभे केले होते. त्याला सोमवार (२७) पर्यंत सात दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. या प्रककरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करीत आहेत.

गुरुवारी दुपारी मनोहरमामाला सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. तेथे डॉ. स्मिता बंडगर यांनी तपासणी केली. त्यास खोकल्याचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहरमामाची करमाळ्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात कसून चौकशी केली.

------

फोटो

Web Title: Manoharmama, who is in police custody, started coughing