शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत अवैध वाळू साठ्यावर मंगळवेढा पोलिसांची कारवाई; वाळूसह उपस्यासाठी वापरण्यात येणारी यारी, ट्रॅक्टर जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 16:49 IST

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याने अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे.

मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा : ब्रह्मपुरी ( ता मंगळवेढा) येथे बठाण रोडवरील भीमा नदीकाठी शेतातून रस्ता करून यारीच्या सहाय्यानं काढण्यात आलेल्या अवैध वाळुसह ट्रॅक्टर, यारीसह लाखो  रुपये  किमतीचा मुद्देमाल १५ एप्रिल शनिवारी सकाळी जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जप्त वाळू मंगळवेढा तहसील कार्यालयात नेण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने व सपोनि बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  केली आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याने अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे.

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील बोराळे बिटचे तुकाराम कोळी, महेश कोळी, ईश्वर दुधाळ व इतर पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदी पथक पेट्रोलिंग करत असताना बठाण रोडवर शेतात वाळू काढण्यात आल्याचे दिसून आले. कोणतीही परवानगी नसताना वाळू साठा मिळून आला असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी इंगोले, तलाठी शेख यांनी अवैध वाळू साठ्याचा पंचनामा केला.

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक वाळू साठ्याचा गोरखधंदा ब्रह्मपुरी परिसरात सध्या फोफावत होता. बठाण रोडवरून अवैधरीत्या वाळूची मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी होत्या. यापूर्वी  ठोस कारवाई न झाल्याने वाळू माफियांचे फावत होते. परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत होते. विनाक्रमांक धावणाऱ्या वाहनांमधून ही चोरटी वाळू वाहतूक सुरू होती. या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे कामही पोलीस ठाण्यात सुरू आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर