मंगळवेढा येथील जुगार आड्डयावर छापा, ९ जण अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:28 IST2017-08-11T13:28:24+5:302017-08-11T13:28:35+5:30
सोलापूर दि ११ : पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीसांची विशेष टिम पेट्रोलिंग करीत होती़ यावेळी मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील शैलेश भुजंग खवतोडे याचे रूममध्ये असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकण्यात आला़

मंगळवेढा येथील जुगार आड्डयावर छापा, ९ जण अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीसांची विशेष टिम पेट्रोलिंग करीत होती़ यावेळी मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील शैलेश भुजंग खवतोडे याचे रूममध्ये असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकण्यात आला़ यावेळी शैलेश भुजंग खवतोडे, भिमराव रामण्णा जाधव, सादिक फरिद शेख, दयानंद नवनाथ दाईगंडे, बाळू शंकर धोञे, अशोक भिमराव गाडीवडर, संतोष मारूती दांडेकर, महादेव बापू देवकर, विकी रवि सावंत सर्व रा मंगळवेढा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे १,१५,९०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व 9 आरोपी विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पो.स.ई गणेश निंबाळकर, पो.ना अमृत खेडकर, अकुंश मोरे, पो.कॉ बाळराजे घाडगे, विलास पारधी, सोमनाथ बोराटे, सिध्दाराम स्वामी, अक्षय दळवी, महादेव लोंढे यांच्या टिमने हे काम केले आहे.